Rotary Rain Run Goa : आकाश, प्रगती ‘रोटरी रेन रन’मध्ये अव्वल; 21 किलोमीटर शर्यतीत वेगवान

बाबू, अयान यांची 10 किलोमीटरमध्ये बाजी
Rotary Rain Run Goa
Rotary Rain Run Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

Rotary Rain Run Goa 2023 : ‘दृष्टी’चा जीवरक्षक आकाश आगरवाडेकर याने पुरुष गटात, तर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन अभियंता प्रगती गर्ग हिने महिलांच्या 21 किलोमीटर खुल्या शर्यतीत वेगवान वेळ नोंदवत रविवारी झालेल्या ‘रोटरी रेन रन’मध्ये विजेतेपद मिळविले.

10 किलोमीटर खुल्या शर्यतीत सांगे येथील 21 वर्षीय बाबू गावकर व मडगावची १८ वर्षीय अयान सुवारिस यांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटात अव्वल कामगिरी साधली.

Rotary Rain Run Goa
Goa Gram Sabha : राज्यातील ग्रामसभा तापल्‍या; अवेडे येथे उपसरपंचाच्या पतीला मारहाण

अस्नोडा येथील २६ वर्षीय आकाश आगरवाडेकर याने पुरुष गटात २१ किलोमीटर अंतर एक तास २२ मिनिटे आणि ४९ सेकंदांत कापले.

‘‘वातावरण चांगले होते, त्यामुळे शर्यतीत धावताना छान अनुभव मिळाला. अगोदरच्या वर्षी मी दहा किलोमीटर शर्यतीत सहभागी झालो होतो, तेव्हा दुसरा क्रमांक मिळाला होता. आता पुढील वर्षीही वेगवान कामगिरीसाठी इच्छुक आहे,’’ असे तो म्हणाला.

प्रगती गर्ग हिला २१ किलोमीटर अंतर कापण्यासाठी दोन तास, सहा मिनिटे आणि ३४ सेकदांचा कालावधी लागला. बांबोळी येथील ३८ वर्षीय प्रगती हिने सांगितले, की ‘‘खुल्या गटातील २१ किलोमीटर शर्यतीत भाग घेण्याची माझी ही पहिलीच वेळ असून अनुभव अविस्मरणीय ठरला. यापूर्वी या स्पर्धेतील १० किलोमीटर शर्यतीत मी विजेतेपद पटकावले होते.’’

Rotary Rain Run Goa
DRI Seize Drugs : कोट्यवधींच्या हेरॉईन तस्करीप्रकरणी गोवा, दिल्लीतील तिघांना अटक; डीआरआयची कारवाई

१० किलोमीटर शर्यतीत पुरुष गटात बाबू गावकर याने ३७ मिनिटे व २३ सेकंद वेळ, तर महिलांत अयान हिने ५० मिनिटे व ०.८ सेकंद वेळ नोंदविली. स्पर्धेत सुमारे दोन हजार धावपटू सहभागी झाले होते.

बांबोळी ॲथलेटिक्स स्टेडियम ते मिरामार आणि तेथून पुन्हा बांबोळी असा शर्यतीचा मार्ग होता. २१ किलोमीटर शर्यतीत पुरुषांत ३२०, तर महिलांत ३० धावपटू होते. याशिवाय वेळ मर्यादेत नसलेली पाच किलोमीटर व दोन किलोमीटर फन वॉक शर्यतही घेण्यात आली.

२१ किलोमीटर शर्यतीला ‘२ एसटीसी’चे कमांडंट ब्रिगेडियर अरविंदरसिंग सावनी यांनी, तर १० किलोमीटर शर्यतीला रोटरी जिल्हा ३१७० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासीर बोर्डास्वाला यांनी सुरवात केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com