Wicketkeeper recruitment India cricket Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Ranji Cricket: गोव्याच्या मोहिमेला यंदा घरच्या मैदानावर आरंभ! चंदीगडसोबत रंगणार सामना; 15 ऑक्टोबरपासून थरार

Goa Vs Chandigarh: १ ते ४ ऑक्टोबर २०१५ या कालावधीत झालेला गोवा व हैदराबाद यांच्यातील पर्वरी येथील रणजी करंडक सामन्यास पावसाचा फटका बसला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा संघ २०२५-२६ मधील मोहिमेला येत्या १५ पासून घरच्या मैदानावरील लढतीने सुरवात करेल. सलग दुसऱ्या वर्षी पर्वरीत ते मोसमातील पहिला सामना खेळतील, तर एकंदरीत सातव्यांदा या मैदानावर ऑक्टोबर महिन्यात लढत होत आहे.

पर्वरी येथील जीसीए मैदानावर गोवा आणि चंडीगड यांच्यातील चार दिवसीय सामना १५ पासून खेळला जाईल. २०२४-२५ मध्येही पहिला सामना पर्वरीत ११ ते १३ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत झालेला होता. प्लेट गटात गोव्याने सामन्यात तिसऱ्याच दिवशी दुबळ्या मणिपूरवर नऊ विकेट राखून मात केली होती.

लढतींना पावसाचा फटका

पर्वरीत ऑक्टोबरमध्ये झालेल्या २०१५-१६ मोसमातील दोन रणजी करंडक लढतीत पावसाची खेळी निर्णायक ठरली होती. १ ते ४ ऑक्टोबर २०१५ या कालावधीत झालेला गोवा व हैदराबाद यांच्यातील पर्वरी येथील रणजी करंडक सामन्यास पावसाचा फटका बसला होता.

अनिर्णित लढतीत चारही दिवसांत मिळून २४१.४ षटकांचा खेळ होऊ शकला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फक्त २० षटकेच टाकता आली होती. ८ ते ११ ऑक्टोबर २०१५ या कालावधीत झालेला गोवा व सेनादल यांच्यातील सामना पावसामुळे प्रभावित झाला होता. तेव्हा चार दिवसीय लढतीत दुसऱ्या दिवशी फक्त ३५ षटकेच टाकणे शक्य झाले होते.

सहापैकी तीन सामने निकाली

पर्वरीत ऑक्टोबरमध्ये झालेल्या यापूर्वीच्या सहा रणजी करंडक क्रिकेट सामन्यांत सहापैकी तीन सामने निकाली ठरले आहेत. त्यात दोन वेळा गोव्याने विजय नोंदविला. एका लढतीत पाहुण्या संघाने बाजी मारली, तर तीन सामने अनिर्णित राहिले.

यापूर्वीच्या सहा लढती

१ ते ४ ऑक्टोबर २०१५ ः गोवा विरुद्ध हैदराबाद, अनिर्णित

८ ते ११ ऑक्टोबर २०१५ ः गोवा विरुद्ध सेनादल, अनिर्णित

१५ ते १७ ऑक्टोबर २०१५ ः गोवा विरुद्ध त्रिपुरा, गोवा ९ विकेट राखून विजयी

६ ते ९ ऑक्टोबर २०१७ ः गोवा विरुद्ध छत्तीसगड, अनिर्णित

२४ ते २७ ऑक्टोबर २०१७ ः गोवा विरुद्ध पंजाब, पंजाब डाव व १३३ धावांनी विजयी

११ ते १३ ऑक्टोबर २०२४ ः गोवा विरुद्ध मणिपूर, गोवा ९ विकेटने विजयी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT