Cricketer Retierment: क्रीडाविश्वात खळबळ! दोन वर्ल्डकप जिंकणाऱ्या 'या' दिग्गजाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Chris Woakes Retirement: इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू क्रिस वोक्स याने आपल्या सुमारे 15 वर्षांच्या प्रदीर्घ क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा अचानक निर्णय घेतला.
Chris Woakes Retirement
Chris Woakes Dainik Gomantak
Published on
Updated on

Chris Woakes Retirement: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आणखी एका मोठ्या खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू क्रिस वोक्स (Chris Woakes) याने आपल्या सुमारे 15 वर्षांच्या प्रदीर्घ क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा अचानक निर्णय घेतला. सोशल मीडियावर एक लांबलचक भावनिक पोस्ट लिहून वोक्सने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करत असल्याची घोषणा केली, ज्यामुळे क्रिकेट जगतात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

निवृत्तीच्या निर्णयामागचे कारण

वोक्सने आपला शेवटचा कसोटी सामना ऑगस्ट 2025 मध्ये भारताविरुद्ध (India) ओव्हल मैदानावर खेळला. याच भारताविरुद्धच्या मालिकेदरम्यान तो जखमी झाला होता. दुखापत होऊनही त्याने शेवटच्या कसोटीच्या अंतिम दिवशी फलंदाजी केली होती, मात्र तो इंग्लंडला विजय मिळवून देऊ शकला नव्हता. या घटनेनंतर, नुकत्याच अ‍ॅशेस मालिकेसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा झाली, तेव्हा त्यात वोक्सच्या नावाचा समावेश नव्हता. संघातून वगळल्यामुळेच वोक्सने हा अचानक निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

Chris Woakes Retirement
Cricketer Retierment: आशिया कपपूर्वी भारताच्या 'या' स्टार खेळाडूचा क्रिकेटला रामराम, IPLमध्ये 3 वेळा घेतलीय हॅटट्रिक

क्रिस वोक्सची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

वोक्सने इंग्लंडसाठी (England) 62 कसोटी सामने खेळले असून 192 बळी घेतले. तथापि, तो 200 पर्यंत पोहोचण्यात कमी पडला. तसेच, त्याने 122 एकदिवसीय सामने खेळले असून 173 बळी घेतले. याशिवाय, त्याने 33 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने देखील खेळले, ज्यात 31 बळी घेतले.

वोक्सच्या निवृत्ती पोस्टमधील भावनिक उद्गार

आपल्या निवृत्तीची घोषणा करताना वोक्सने सोशल मीडियावर एक विस्तृत आणि भावनिक पोस्ट लिहिली. तो म्हणाला, "ती वेळ आता आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याची हीच ती योग्य वेळ आहे, असे मी ठरवले."

"इंग्लंडकडून खेळणे हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते आणि मला हे स्वप्न जगता आले, यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान मानतो. गेल्या 15 वर्षांत इंग्लंडचे प्रतिनिधित्व करणे, 'थ्री लायन्स'ची जर्सी परिधान करणे आणि अनेक आयुष्यभराचे मित्र बनलेल्या सहकाऱ्यांसोबत ड्रेसिंग रुम शेअर करणे, या गोष्टींचा मला खूप अभिमान वाटतो," असेही त्याने म्हटले.

Chris Woakes Retirement
Goa Cricket Betting: भारत-पाक फायनल सामन्यावर सट्टा, सांकवाळमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 10 लाखांच्या मुद्देमालासह 5 जण ताब्यात

विश्वचषक आणि कुटुंबाचे आभार

तसेच, 2011 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेले पदार्पण कालचीच गोष्ट वाटते, पण जेव्हा तुम्ही मजा करत असता, तेव्हा वेळ पटकन निघून जातो, असे मत त्याने व्यक्त केले. दोन विश्वचषक जिंकणे आणि काही शानदार अ‍ॅशेस मालिकांचा भाग होणे याबद्दल मी कधीही विचार केला नव्हता, अशी भावनाही त्याने व्यक्त केली.

शेवटी त्याने आपले आई-वडील, पत्नी एमी आणि मुली लैला व एवी यांचे आभार मानले. "इतक्या वर्षांमध्ये दिलेल्या तुमच्या अतुट प्रेम, समर्थन आणि त्यागाबद्दल धन्यवाद... तुमच्याशिवाय हे सर्व शक्य नाही," असे म्हणत त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीचा समारोप केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com