38th National Games of India Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

National Games 2025: गोव्याला 14 खेळांमध्येच पात्रता! राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत किती पदके मिळणार?

2025 National Games of India: भक्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅनोईंगमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व करण्यास एक खेळाडू असून तो गोवा ऑलिंपिक संघटनेचे निकष पूर्ण करू शकलेला नाही.

Sameer Panditrao

2025 National Games of India

पणजी: गोव्याने घरच्या मैदानावर ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्व ४३ खेळांत भाग घेताना नव्वदपेक्षा जास्त पदके जिंकून इतिहास घडविला होता, आता उत्तराखंडमध्ये होणाऱ्या ३८व्या स्पर्धेत १४ खेळांतच पात्रता मिळाली असून पदकांची संख्या कमालीची घटण्याचे संकेत आहेत.

‘‘गोव्यात झालेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यजमान या नात्याने सर्व खेळांत सहभाग घेता आला होता. २८ जानेवारीपासून उत्तराखंडमध्ये होणाऱ्या ३८व्या स्पर्धेत पात्रता निकषांनुसार गोवा १४ खेळांतच पात्र ठरला आहे. त्यामुळे पदके घटणार हे निश्चित, तरीही पदकतक्त्यात राज्याला दुहेरी आकडी पदके मिळण्याची आशा आहे,’’ असे गोवा ऑलिंपिक असोसिएशनचे सचिव गुरुदत्त भक्ता यांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वीच्या स्पर्धेत गोव्याला एकूण १६ खेळांत २७ सुवर्णांसह ९३ पदके मिळाली होती.

भक्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील स्पर्धेसाठी जलतरण, ॲथलेटिक्स, तिरंदाजी, बीच व्हॉलिबॉल, बॉक्सिंग, सायकलिंग, फुटबॉल (पुरुष), मल्लखांब, मॉडर्न पेंटॅथलॉन, स्क्वॉश, तायक्वांदो, ट्रायथलॉन, वेटलिफ्टिंग, वुशू या खेळांत गोव्याचे क्रीडापटू पात्र ठरले आहेत.

दोन वर्षांपूर्वी तिरंदाजी, सायकलिंग, फुटबॉल, ट्रायथलॉन या खेळांत गोव्याला पदके मिळाली नव्हती, तर बीच व्हॉलिबॉलला स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली नव्हती. उत्तराखंडमधील स्पर्धेत मल्लखांब प्रात्यक्षिक खेळ आहे. स्पर्धात्मक प्रकारात एकूण ३२ खेळ आहेत.

कॅनोईंगबाबत प्रश्नचिन्ह

भक्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅनोईंगमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व करण्यास एक खेळाडू असून तो गोवा ऑलिंपिक संघटनेचे निकष पूर्ण करू शकलेला नाही. त्याने तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यास तो गोव्यातर्फे खेळू शकतो, तसे झाल्यास उत्तराखंडमध्ये गोव्याचा १५ खेळांत सहभाग असेल.

या खेळांत पदके अपेक्षित

राष्ट्रीय पातळीवरील मागील दोन वर्षांतील कामगिरीनुसार, गोव्याला उत्तराखंडमधील स्पर्धेत बॉक्सिंग, मॉडर्न पेंटॅथलॉन, जलतरण, स्क्वॉश, तायक्वांदो, फुटबॉल, वेटलिफ्टिंग, वुशू या खेळात पदके मिळू शकतात.

एकूण ७८ जणांचा सहभाग

गोवा ऑलिंपिक संघटनेच्या नोंदणीनुसार, उत्तराखंडमधील ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याचे एकूण ७८ जण सहभागी होतील. यामध्ये ४६ पुरुष, तर ३२ महिला आहेत.

गोव्याचे पदकप्राप्त खेळ स्पर्धेबाहेर

गोव्याने ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत स्क्वे मार्शल आर्टमध्ये १० सुवर्णांसह एकूण २७ पदके, तर सेपॅक टॅक्रो खेळात सहा सुवर्णांसह आठ पदके जिंकली होती, मात्र हे दोन्ही खेळ ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नाहीत. पेंचाक सिलाटमध्ये गोव्याला एकूण १६ पदके मिळाली होती, हा खेळही उत्तराखंडमधील स्पर्धेत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

SCROLL FOR NEXT