FC Goa: 'पहिल्या मिनिटापासून एकाग्रतेने खेळावे लागेल अन्यथा...'; हैद्राबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी प्रशिक्षक मार्केझ यांचा इशारा

FC Goa VS Hyderabad : मागील पाच लढतीत बरोबरीचा एक गुण प्राप्त केलेल्या हैदराबादच्या खाती फक्त आठ गुण असून ते तेरा संघांत बाराव्या क्रमांकावर आहेत.
ISL 2024 25 Goa Football Match
FC Goa VS Hyderabad Dainik Gomantak
Published on
Updated on

ISL 2024 25 Goa Football Match

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सलग आठ सामने अपराजीत असल्याने एफसी गोवाने अपेक्षा उंचावल्या आहेत, तरीही तळातून दुसऱ्या स्थानी असलेल्या हैदराबाद एफसीविरुद्ध निश्चिंत राहता येणार नाही. पूर्ण एकाग्रतेने मैदानावर पहिल्या मिनिटापासून खेळावे लागेल, आव्हान धोकादायक ठरेल, असा सावध पवित्रा मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी लढतीच्या पूर्वसंध्येला घेतला.

एफसी गोवा व हैदराबाद एफसी यांच्यातील सामना बुधवारी (ता.८) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होईल. त्यावेळी मागील आठ सामन्यांतून २० गुणांची कमाई केलेल्या एफसी गोवाचे पारडे जड असेल.

सध्या ते १३ सामन्यांतून २५ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. हैदराबाद एफसीविरुद्ध विजयी कामगिरी केल्यास मार्केझ यांचा संघ दुसऱ्या क्रमांकावर येईल. मागील पाच लढतीत बरोबरीचा एक गुण प्राप्त केलेल्या हैदराबादच्या खाती फक्त आठ गुण असून ते तेरा संघांत बाराव्या क्रमांकावर आहेत.

ISL 2024 25 Goa Football Match
GCA: मतभेदाला तिलांजली, क्रिकेटला प्राधान्य! जीसीए आमसभेत ‘सतावणूक’ प्रकरण व्यवस्थापकीय समितीकडे

‘सध्या स्पर्धेत तळाचे स्थान टाळण्यासाठी हैदराबाद एफसी व मोहम्मेडन स्पोर्टिंग यांच्यात चढाओढ आहे. हैदराबादचा संघ नामुष्की टाळण्यासाठी खेळत असून त्यांना कदापि कमी लेखता येणार नाही, ते धोक्याचे ठरेल,’ असे मत ५६ वर्षीय मार्केझ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. निलंबनामुळे एफसी गोवा संघातील प्रमुख बचावपटू ओडेई ओनाइंडिया हैदराबादविरुद्ध खेळू शकणार नाही.

त्याची अनुपस्थिती जाणवणार असल्याचे मार्केझ यांनी अप्रत्यक्षरीत्या सुचवताना सांगितले, की ‘ओडेई आयएसएलमधील सर्वोत्तम परदेशी बचावपटू आहे. त्याच्या अनुपस्थितीत खेळणे अवघड असेल; परंतु आम्ही त्याच्या जागी योग्य खेळाडूस उतरवू.’ हैदराबाद एफसीने प्रशिक्षक बदलला असून सध्या ते अंतरिम प्रशिक्षक शमील चेम्बकथ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहेत. त्याविषयी मार्केझ म्हणाले, की ‘त्यांच्या प्रशिक्षकपदात बदल झालेला असला, तरी खेळण्याची शैली विशेष बदललेली नाही. संघरचनेत नक्कीच बदल झालेला आहे.’

ISL 2024 25 Goa Football Match
ISL 2024-25: 'बोरिस'चा गोल ठरला लाखमोलाचा! FC Goa ची विजयी हॅट्रिक; केरळा ब्लास्टर्सला एका गोलने नमविले

सलग १३ सामन्यांत गोल, ८ सामने अपराजीत

एफसी गोवाने यावेळच्या आयएसएल स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या सर्व १३ सामन्यांत गोल करण्याची किमया साधली आहे. आठ सामने अपराजीत राहताना सहा विजय व दोन बरोबरीची नोंद केली आहे. त्यांनी २७ गोल नोंदविले आहेत. त्यात अल्बेनियाच्या आर्मांद सादिकू याने आठ, तर अचूक नेम साधणाऱ्या ब्रायसन फर्नांडिस याच्या पाच गोलचा समावेश आहे. शिवाय बोर्हा हेर्रेरा याने चार, तर उदांता सिंगने तीन गोल केले आहेत. तुलनेत हैदराबाद एफसीने १४ लढतीतून फक्त १० गोल नोंदविताना तब्बल २९ गोल स्वीकारले आहेत. साहजिकच एफसी गोवाचे आक्रमण सरस ठरण्याचे संकेत आहेत.

एफसी गोव्याच्या ड्रेसिंग रुममधील सध्याचे वातावरण विलक्षण आहे. या चमूत मी अतिशय आनंदी आहे. सुरवातीला मी गोल केले; पण मागील काही सामन्यांत गोल करू शकलो नाही. त्याबद्दल चिंता नाही; कारण संघासाठी चांगले खेळत असून सहकाऱ्यांना साह्य करत आहे. हैदराबादविरुद्ध विजयाचेच लक्ष्य राहील, तरीही लढत आव्हानात्मक असेल. आम्हाला सुरवातीपासून दक्ष राहावे लागेल.

आर्मांदो सादिकू, एफसी गोवाचा आघाडीपटू

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com