पणजी: एफसी गोवा एफसीच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात ब्रायसन फर्नांडिसने दबदबा राखला. मोसमात शानदार कामगिरी केलेल्या या २३ वर्षीय मध्यरक्षकाला क्लबचा मोसमातील सर्वोत्तम युवा, खेळाडूंनी निवडलेला सर्वोत्कृष्ट आणि चाहत्यांनी निवडलेला उत्कृष्ट खेळाडू असे एकूण तीन पुरस्कार मिळाले.
हुकमी बचावपटू संदेश झिंगन एफसी गोवा क्लबचा मोसमातील सर्वोत्तम खेळाडू ठरला, तर सर्वाधिक गोलसाठी ‘कोरो मेडल’ स्पॅनिश खेळाडू इकेर ग्वॉर्रोचेना याला मिळाले. क्लबच्या इतिहासात सर्वकालीन सर्वाधिक गोल करणारा फेर्रान कोरोमिनास याच्या नावे यंदापासून ‘कोरो मेडल’ देण्यास सुरवात झाली.
बोर्हा हेर्रेरा याने आयएसएल करंडक उपांत्य फेरीतील दुसऱ्या टप्प्यात नोंदविलेला गोल क्लबचा मोसमातील सर्वोत्कृष्ट ठरला.
एफसी गोवाचे मोसमातील इतर पुरस्कारप्राप्त ः १३ वर्षांखालील खेळाडू ः कर्टसन मिनेझिस, १५ वर्षांखालील खेळाडू ः क्रॉसली डायस, १७ वर्षांखालील खेळाडू ः संगम शेट्ये, डेव्हलपमेंट संघ खेळाडू ः सिटरॉय कार्व्हालो, युवा पथदर्शक पुरस्कार ः प्रचित गावकर, ‘गौर स्पिरिट’ पुरस्कार ः एफसी गोवा वैद्यकीय
चमू, लुकास कार्दोझ स्मृती पुरस्कार ः चंदन कुंडईकर, प्रगती पुरस्कार ः ऋतिक तिवारी, लोहपुरुष पुरस्कार ः बोरिस सिंग.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.