Super Cup 2025: दणदणीत विजयासह FC Goa उपांत्यपूर्व फेरीत दाखल, ग्वॉर्रोचेनाची शानदार हॅटट्रिक

FC Goa Vs Gokulam Kerala: ग्वॉर्रोचेना याने आयएसएल स्पर्धेतील चमकदार फॉर्म कायम राखताना अनुक्रमे २३, ३५ व ७१व्या मिनिटाल प्रत्येकी एक गोल केला.
FC Goa Vs Gokulam Kerala, Super Cup 2025
FC Goa Vs Gokulam KeralaX
Published on
Updated on

पणजी: इकेर ग्वॉर्रोचेना याच्या शानदार हॅटट्रिकच्या बळावर एफसी गोवाने गोकुळम केरळावर ३-० फरकाने सहज विजय नोंदवून सुपर कप फुटबॉल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. ‘राऊंड ऑफ १६’ फेरीतील सामना सोमवारी भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर झाला.

ग्वॉर्रोचेना याने आयएसएल स्पर्धेतील चमकदार फॉर्म कायम राखताना अनुक्रमे २३, ३५ व ७१व्या मिनिटाल प्रत्येकी एक गोल केला, त्यापैकी पहिला गोल त्याने पेनल्टी फटक्यावर नोंदविला. तोच सामन्याचा मानकरी ठरला.

देयान द्राझिक याला बॉक्समध्ये पाडल्यानंतर एफसी गोवास पेनल्टी फटका मिळाला. ग्वॉर्रोचेना याने अचूक फटका मारताना कोणतीच चूक केली नाही. तेरा मिनिटानंतर आकाश संगवान याच्या शानदार क्रॉस पासवर ग्वॉर्रोचेना याने प्रतिस्पर्धी गोलरक्षकास सहज चकविले. उत्तरार्धात जय गुप्ता याने रचलेल्या चालीवर उदांता सिंग याच्या चेंडू गेला.

उदांताने स्वतः गोलसाठी फटका न मारता ग्वॉर्रोचेना याला गोल करण्याची संधी उपलब्ध करून दिल्यानंतर स्पॅनिश खेळाडूने यावेळच्या सुपर कप स्पर्धेतील पहिल्या हॅटट्रिकचा मान मिळविला. अपेक्षेनुसार बचावफळीतील दक्षतेमुळे एफसी गोवास क्लीन शीट राखता आली. गोलरक्षक ऋतिक तिवारी, बचावफळीतील आधारस्तंभ कर्णधार ओदेई ओनाइंडिया, संदेश झिंगन यांनी गोकुळम केरळाच्या आक्रमणांना भेदक ठरण्यास वाव दिला नाही. ऋतिकने गोलरक्षक या नात्याने मोसमातील वैयक्तिक आठव्या क्लीन शीटची नोंद केली.

FC Goa Vs Gokulam Kerala, Super Cup 2025
I League: चर्चिल ब्रदर्स विजयी घोषित, पण करंडकाच्या प्रतिक्षेत; ‘इंटर काशी’च्या भूमिकेकडेही लक्ष

इकेर ग्वॉर्रोचेनाची कमाल...

स्पॅनिश खेळाडूचे यंदा आयएसएल स्पर्धेत ७ गोल

आता सुपर कपमध्ये ३ मिळून मोसमात एकूण १० गोल

एफसी गोवातर्फे एकूण ४५ सामन्यांत २३ गोल

एफसी गोवातर्फे सर्वाधिक गोल करणारा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू

FC Goa Vs Gokulam Kerala, Super Cup 2025
I League: चर्चिल ब्रदर्सच आय-लीग फुटबॉल विजेते! कमिटीच्या आदेशानंतर AIFF कडून घोषणा

पंजाब एफसीचा ओडिशाला धक्का

सुपर कप स्पर्धेच्या ‘राऊंड ऑफ १६’ फेरीत पंजाब एफसीने माजी विजेत्या ओडिशा एफसीला ३-० असा पराभवाचा धक्का दिला. विजयी संघासाठी अस्मिर सुलिच याने १४व्या, पुल्गा विदाल याने ६९व्या, तर निहाल सुधीश याने ९०व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. उपांत्यपूर्व फेरीत पंजाब एफसीची लढत एफसी गोवाविरुद्ध होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com