Rohan Gawas Desai Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

GCA: अखेर विषय संपला! रोहन गावस देसाईच ‘जीसीए’चे प्रतिनिधी; BCCI निवडणुकीसाठी शिक्कामोर्तब

Rohan Gawas Desai: बैठकीत बीसीसीआय आमसभा प्रतिनिधी म्हणून कोणाच्याच नावावर शिक्कामोर्तब न झाल्यामुळे अंतिम निर्णय होऊ शकला नव्हता, तसेच रोहन यांच्यासाठी बहुमताने घेतलेल्या ठरावाची प्रत जीसीए सीईओने उपलब्ध केली नाही.

Sameer Panditrao

पणजी: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवडणूक २०२५ चे निवडणूक अधिकारी ए. के. जोती यांनी शनिवारी मतदार यादी मसुद्यात गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) प्रतिनिधी म्हणून बीसीसीआय संयुक्त सचिव रोहन गावस देसाई यांचे नाव समाविष्ट केले. संध्याकाळी जाहीर झालेल्या या यादीनुसार, येत्या २८ रोजी होणाऱ्या आमसभा आणि निवडणूक प्रक्रियेत जीसीएचे प्रतिनिधित्व रोहन करतील.

शुक्रवारी दुपारी दोन वाजता मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जीसीए व्यवस्थापकीय समितीची बैठक झाली, तेव्हा पाच सदस्यांनी रोहन यांच्या नावाची शिफारस करून बहुमताचे ठराव मंजूर केला होता, तसेच सचिव शंभा नाईक देसाई यांनी बैठकीत बीसीसीआय आमसभेसाठी अध्यक्ष विपुल फडके यांचे नाव सुचविले.

त्यानंतर बैठकीत बीसीसीआय आमसभा प्रतिनिधी म्हणून कोणाच्याच नावावर शिक्कामोर्तब न झाल्यामुळे अंतिम निर्णय होऊ शकला नव्हता, तसेच रोहन यांच्यासाठी बहुमताने घेतलेल्या ठरावाची प्रत जीसीए सीईओने उपलब्ध केली नाही. बीसीसीआय निवडणूक अधिकाऱ्यास प्रतिनिधी नेमणूक पत्र पाठविण्याची शुक्रवारी रात्री आठपर्यंत मुदत होती.

ती टळून जात असताना जीसीए सीईओतर्फे बीसीसीआय निवडणूक अधिकाऱ्यास कोणाचेही नाव पाठविण्यास असमर्थ असल्याचे पत्र ईमेलद्वारे पाठविण्यात आला. त्यामुळे रोहन देसाई जीसीएचे बीसीसीआय आमसभेत प्रतिनिधित्व करू शकणार नाहीत, तसेच संयुक्त सचिवपदाची निवडणूक लढवू शकता नसल्याचा निष्कर्ष निघाला.

जीसीए संयुक्त सचिव रूपेश नाईक यांनी बीसीसीआय निवडणूक यादी मसुद्यासाठी जीसीए नियुक्ती प्रतिनिधीचे नाव पाठविण्याची मुदत संपण्यापूर्वी गोवा खंडपीठाच्या आदेशाची प्रत, तसेच बहुसंख्य पाच जीसीए सदस्यांना पत्र फिरवून माझे नाव पाठविण्याच्या ठरावाची प्रत बीसीसीआय निवडणूक अधिकारी कार्यालयात शुक्रवारी पाठविली. त्यानुसार आज माझ्या नावाचा मतदार यादीत समावेश झाला.’’

- रोहन गावस देसाई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT