BCCI Election: 'बीसीसीआय' निवडणुकीसाठी 'GCA'चा प्रतिनिधी ठरेना; कोर्टानं दिला 'हा' आदेश

BCCI Apex Council election 2025: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अपेक्स कौन्सिल निवडणुकीत गोव्याचा प्रतिनिधी कोण असणार, हे अद्याप जीसीए'कडून निश्चित झालं नाहीय.
BCCI Election
BCCI ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अपेक्स कौन्सिल निवडणुकीत गोव्याचा प्रतिनिधी कोण असणार, याबाबत अद्यापही अनिश्चितता कायम आहे. गोवा क्रिकेट असोसिएशननं (GCA) या संदर्भात अजून कोणचंही नाव अधिकृतरीत्या निश्चित केलेलं नाही.

याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी ( १२ संप्टेंबर ) मुंबई उच्च न्यायालयातील न्या. भारती डांगरे आणि न्या. आशिष चव्हाण यांच्या खंडपीठानं यावर सुनावणी घेतली. सुनावणीदरम्यान न्यायालयानं जीसीएला तातडीची बैठक घेऊन प्रतिनिधी निश्चित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

BCCI Election
Goa Drugs Issue: ..स्वत:चे मरण स्वत:च्या डोळ्यांनी 'गोव्याला' पाहावे लागत आहे! ड्रग्जचा विळखा

ही सुनावणी रुपेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर झाली. बीसीसीआयनं ९ सप्टेंबर रोजी अधिकृत पत्रव्यवहार करूनही जीसीएनं बैठक बोलावली नव्हती. यावर नाराजी व्यक्त करत याचिकाकर्त्यांनी न्यायालयीन आदेश मागितला होता.

सुनावणीदरम्यान याचिकाकत्यांचे वरिष्ठ वकील मुस्तफा डॉक्टर व आशिष कामत यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, जीसीएच्या आठ सदस्यापैकी बहुसंख्य पाच सदस्यांचा पाठिंबा असून ते सर्व एकमुखाने रोहन देसाई यांना प्रतिनिधी म्हणून पाठवण्यास तयार आहेत.

BCCI Election
Old Goa Crime: डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी घटना; ICU मधील स्पॅनिश महिलेचा विनयभंग, DNB विद्यार्थ्याला अटक

न्यायालयीन आदेशामुळे आता जीसीएला तातडीची बैठक घेऊन प्रतिनिधी निश्चित करावा लागणार आहे. २८ सप्टेंबरच्या निवडणुकीत गोव्याचा अधिकृत प्रतिनिधी कोण असेल? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com