Darshan Misal Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Vijay Hazare Trophy साठी 'टीम गोवा' सज्ज! दर्शनकडे नेतृत्वाची जबाबदारी; दोन वर्षांनंतर अमूल्यचं पुनरागमन

Goa Cricket Team: डावखुरा फिरकी गोलंदाज अमूल्य पांढ्रेकर याने तब्बल दोन वर्षांनंतर गोव्याच्या सीनियर पुरुष क्रिकेट संघात पुनरागमन केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News: डावखुरा फिरकी गोलंदाज अमूल्य पांढ्रेकर याने तब्बल दोन वर्षांनंतर गोव्याच्या सीनियर पुरुष क्रिकेट संघात पुनरागमन केले आहे. शनिवारपासून (ता. २१) खेळल्या जाणाऱ्या विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेसाठी गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव रोहन गावस देसाई यांनी मंगळवारी संघ जाहीर केला.

रणजी संघ कर्णधार दर्शन मिसाळ (Darshan Misal) याच्याकडे एकदिवसीय संघाचे नेतृत्व बहाल करण्यात आले आहे. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी त्याच्याऐवजी अष्टपैलू दीपराज गावकर संघाचा कर्णधार होता. २८ वर्षीय अमूल्य नोव्हेंबर २०२२ मध्ये गोव्यातर्फे एकदिवसीय स्पर्धेत शेवटच्या वेळेस खेळला होता. स्पर्धेत गोव्याचा (Goa) अ गटात समावेश असून सामने राजस्थानमधील जयपूर येथे खेळले जातील.

याशिवाय रणजी स्पर्धेत खेळलेले; पण टी-२० संघात नसलेले स्नेहल कवठणकर, मंथन खुटकर, समर दुभाषी, ऋत्विक नाईक, राहुल मेहता यांनाही एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे. तंदुरुस्तीअभावी कर्नाटकचा (Karnataka) पाहुणा क्रिकेटपटू रोहन कदम याची निवड झालेली नाही. टी-२० स्पर्धेत अर्जुन तेंडुलकर तीन सामने खेळला होता, त्यानंतर दुखापतग्रस्त झाल्याने तो संघाबाहेर गेला होता. अर्जुन एकदिवसीय संघात परतला असून त्याची तंदुरुस्ती निर्णायक असेल.

गोव्याचा एकदिवसीय क्रिकेट संघ

ईशान गडेकर, स्नेहल कवठणकर, सुयश प्रभुदेसाई (उपकर्णधार), के. व्ही. सिद्धार्थ, दीपराज गावकर, मंथन खुटकर, मोहित रेडकर, दर्शन मिसाळ (कर्णधार), समर दुभाषी, कश्यप बखले, ऋत्विक नाईक, शुभम तारी, फेलिक्स आलेमाव, अमूल्य पांढ्रेकर, विकास सिंग, विजेश प्रभुदेसाई, अर्जुन तेंडुलकर, राहुल मेहता.

गोव्याचे अ गट वेळापत्रक

ता. २१ डिसेंबर : विरुद्ध ओडिशा, ता. २३ डिसेंबर : विरुद्ध हरियाना, ता. २६ डिसेंबर : विरुद्ध मणिपूर, ता. २८ डिसेंबर : विरुद्ध उत्तराखंड, ता. ३१ डिसेंबर : विरुद्ध आसाम, ता. ३ जानेवारी : विरुद्ध गुजरात, ता. ५ जानेवारी : विरुद्ध झारखंड.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Viral Video: पाकिस्तानी तरुणीची देशभक्ती पाहून लोक थक्क, स्वातंत्र्य दिनी गायलं 'भारतीय गाणं'; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT