Vijay Hazare Trophy: हरियाणाने पहिल्यांदाच जिंकली विजय हजारे ट्रॉफी, फायनलमध्ये राजस्थानचा उडवला धुव्वा

Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये हरियाणाने राजस्थानचा 30 धावांनी पराभव केला.
Haryana Team
Haryana Team Dainik Gomantak

Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये हरियाणाने राजस्थानचा 30 धावांनी पराभव केला. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात हरियाणाच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी गमावून 287 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, खराब सुरुवातीतून सावरल्यानंतर राजस्थानचा संघ विजयाकडे वाटचाल करत होता, पण हरियाणाने दमदार पुनरागमन करत राजस्थानला 257 धावांत गुंडाळले. हरियाणाने पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफीवर कब्जा केला.

हरियाणाचा संघ चॅम्पियन ठरला

हरियाणाचा संघ प्रथमच विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला आणि पहिल्यांदाच विजेतेपदावर कब्जा केला. त्याचवेळी, राजस्थान संघाने यापूर्वी 2006-07 मध्ये अंतिम फेरी गाठली होती, जिथे त्यांना मुंबईविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. आता पुन्हा एकदा राजस्थानचा संघ अंतिम फेरीत हरला.

Haryana Team
Vijay Hazare Trophy: गोव्यावर पाचव्या पराभवाची नामुष्की; बडोद्याचा 4 विकेटने विजय

हरियाणाचा डाव

दरम्यान, पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या हरियाणाची सुरुवात खराब झाली होती. युवराज सिंग एक धाव काढून बाद झाला. यानंतर अंकितने हिमांशू राणासोबत दुसऱ्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी केली. हिमांशू 10 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर कर्णधार अशोक मनेरियाने अंकितसोबत तिसऱ्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी केली. अंकित 91 चेंडूत 12 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 88 धावा करुन बाद झाला. तर मनेरियाने शानदार खेळी खेळली. आठ चौकारांच्या मदतीने 96 चेंडूत 70 धावा करुन तो बाद झाला. यानंतर नियमित अंतराने विकेट पडत राहिल्याने संघाला 287 धावांपर्यंत मजल मारता आली. रोहित प्रमोद शर्माने 20, निशांत सिंधूने 29, राहुल तेवतियाने 24 आणि हर्षल पटेलने 2 धावा केल्या. सुमित कुमारने 16 चेंडूत 28 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. राजस्थानकडून अनिकेत चौधरीने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर अराफत खानने दोन विकेट घेतल्या. राहुल चहरला एक विकेट मिळाली.

राजस्थानचा डाव

दुसरीकडे, 288 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान संघाची सुरुवात खूपच खराब झाली. राम मोहन चौहान एक धावा करुन बाद झाला तर महिपाल लोमरर दोन धावा करुन बाद झाला. यानंतर कर्णधार दीपक हुड्डा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. करण लांबा 20 धावा करुन बाद झाला. राजस्थानच्या तीन विकेट 12 धावांवर पडल्या होत्या आणि चौथा धक्का 80 वर बसला होता. यानंतर अभिजीतने कुणाल सिंग राठोडसोबत पाचव्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली. दरम्यान, अभिजीतने शानदार शतक झळकावले. ही भागीदारी हर्षल पटेलने मोडली. त्याने अभिजीतला झेलबाद केले. अभिजीतने 129 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 106 धावा केल्या.

Haryana Team
Vijay Hazare Trophy: स्नेहल, सुयशची शतके, अर्जुन तेंडुलकरचे चार बळी; गोव्याचा नागालँड विरोधात सर्वात मोठा विजय

त्याचवेळी, हर्षलने पुन्हा कुणाल सिंगला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तो 65 चेंडूंत चार चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 79 धावा करुन बाद झाला. यानंतर कुकणा अजय सिंग आठ धावा करुन बाद झाला, अनिकेत चौधरी चार धावा करुन बाद झाला आणि अराफत खान एक धावा करुन बाद झाला. खलील अहमद खातेही उघडू शकला नाही. राहुल चहर 18 धावा करुन नाबाद राहिला. हरियाणाकडून सुमित कुमार आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. तर अंशुल कंबोज आणि राहुल तेवतिया यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com