Vijay Hazare Trophy: गोव्यावर पाचव्या पराभवाची नामुष्की; बडोद्याचा 4 विकेटने विजय

स्नेहल-दर्शनच्या मेहनतीवर पाणी
दर्शन मिसाळ, स्नेहल कवठणकर
दर्शन मिसाळ, स्नेहल कवठणकरDainik Gomantak

Vijay Hazare Trophy 2023: गोव्याच्या सीनियर पुरुष क्रिकेट संघातील बहुतांश खेळाडू फक्त कागदी वाघ असल्याचे विजय हजारे करंडक लिस्ट ए (एकदिवसीय) क्रिकेट स्पर्धेतील कामगिरीने सिद्ध झाले.

या स्पर्धेत त्यांच्यावर मंगळवारी पाचव्या पराभवाची नामुष्की आली. ई गटातील शेवटच्या लढतीत त्यांना बडोद्याने ४ विकेट आणि १८ चेंडू राखून हरविले.

मुंबई येथील वांद्रे-कुर्ला संकुलातील शरद पवार क्रिकेट अकादमी मैदानावर सामना झाला. बडोद्याने मंगळवारी सकाळी नाणेफेक जिंकून गोव्याला प्रथम फलंदाजीस पाचारण केले.

सलामीवीर स्नेहल कवठणकर (५०) याने अर्धशतक नोंदविताना ईशान गडेकर (३९) याच्यासमेवत गोव्याला १९.४ षटकांत ८९ धावांची सलामी दिली, परंतु इतर फलंदाजांनी निराशा केल्यामुळे गोव्याचा डाव २२८ धावांत संपुष्टात आला.

नंतर गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ याने डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीने प्रभाव पाडताना ४ विकेट टिपल्या, परंतु इतर गोलंदाजांना दुसऱ्या टोकाला गडी बाद करून कर्णधाराला साथ देणे जमले नाही. परिणामी बडोद्याने ४७ षटकांत ६ बाद २३२ धावा करून सामना जिंकला.

दर्शन मिसाळ, स्नेहल कवठणकर
Goa Government Hotels: स्वस्तात गोवा ट्रिप करायचीय? मग 'या' सरकारी हॉटेल्समध्ये करा बुकिंग

एकमेव विजय दुबळ्या नागालँडविरुद्ध

गोव्याने स्पर्धेत फक्त एक सामना जिंकला, तोही दुबळ्या नागालँडविरुद्ध तब्बल २३२ धावांनी, मात्र मातब्बर प्रतिस्पर्ध्यांसमोर गोव्याच्या संघाने सपशेल नांगी टाकली.

स्पर्धेत गोव्याला मध्य प्रदेशविरुद्ध ७ विकेटने, तमिळनाडूविरुद्ध ३३ धावांनी, पंजाबविरुद्ध ६७ धावांनी, बंगालविरुद्ध ८ विकेटने, तर बडोद्याविरुद्ध ४ विकेटने पराभव पत्करावा लागला. गतमोसमातील गोव्याच्या तीन पराभवांच्या तुलनेत यंदा पाच पराभव ही कामगिरी निराशाजनक ठरली.

सात संघांत सहावा क्रमांक

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याला सात संघांच्या ई गटात चार गुणांसह सहावा क्रमांक मिळाला. सहाही सामने गमावलेल्या नागालँडला शेवटचा सातवा क्रमांक मिळाला.

सहापैकी पाच सामने जिंकलेल्या बंगाल व तमिळनाडूचे प्रत्येकी २० गुण झाले, मध्य प्रदेशने चार विजयांसह १६, तर प्रत्येकी तीन सामने जिंकलेल्या पंजाब व बडोद्याचे समान १२ गुण झाले.

दर्शन मिसाळ, स्नेहल कवठणकर
Dona Paula Jetty: जुन्या दोना पावला जेट्टीची GTDC करणार पुनर्बांधणी अन् दुरूस्ती; 7.5 कोटी रूपये खर्च

संक्षिप्त धावफलक

गोवा ः ४८.४ षटकांत सर्वबाद २२८ (ईशान गडेकर ३९, स्नेहल कवठणकर ५०, सुयश प्रभुदेसाई ८, राहुल त्रिपाठी ३५, दर्शन मिसाळ १८, के. व्ही. सिद्धार्थ १०, दीपराज गावकर २०, अर्जुन तेंडुलकर १३, विकास सिंग नाबाद ७, लक्षय गर्ग ०, मोहित रेडकर ८, विशाल यादव ३८-२, निनाद राठवा ३९-३)

पराभूत वि. बडोदा ः ४७ षटकांत ६ बाद २३२ (किनिट पटेल ६८, शाश्वत रावत २८, अभिमन्यूसिंग राजपूत नाबाद ७१, भानू पुनिया २७, अतित शेठ नाबाद १२, अर्जुन तेंडुलकर ९-१-५२-१, लक्षय गर्ग ६-०-३४-०, दर्शन मिसाळ १०-१-४१-४, मोहित रेडकर १०-०-५७-१, विकास सिंग १०-०-३२-०, राहुल त्रिपाठी २-०-११-०).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com