History Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

History: 1565 मधील तालिकोटाची ती ऐतिहासिक लढाई; एका महासाम्राज्याचा असा झाला दुःखद अंत

Krishnadevaraya History: श्री कृष्णदेवरायाने नंतर आपले लक्ष कोंडाविडूच्या रेड्डी, भुवनगरीचे वेलामा आणि उम्मतूर यांच्याकडे केन्द्रित केले, जे विजयनगर साम्राज्याचे सामंत होते.

दैनिक गोमन्तक डिजिटल

सर्वेश बोरकर

विजयनगर साम्राज्याच्या युवराजावर विषप्रयोग केल्याबद्दल पंतप्रधान तिम्मारुसुला व मुलांना दोषी ठरवण्यात आले, त्याच्या मुलांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आणि तिम्मारुसुला आंधळे करण्याची शिक्षा देण्यात आली.

विजयनगर साम्राज्य हे दख्खन पठाराच्या प्रदेशात स्थित दक्षिण भारतीय साम्राज्य, श्री कृष्णदेवराय हे तुलुवा राजवंशाचे विजयनगर साम्राज्यावर राज्य करणारे तिसरे राजवंश, इ. स १५०९ मध्ये तो या घराण्याचा तिसरा शासक बनला आणि त्याचा मोठा सावत्र भाऊ श्री विरनरसिंहराय आला. हम्पी येथील विरुपाक्ष मंदिरातील श्री कृष्णदेवरायाचा इ. स १५०९ चा कन्नड शिलालेख राज्याभिषेकाचे वर्णन करतो.

जेव्हा श्री कृष्णदेवरायाचा सम्राट म्हणून राज्याभिषेक झाला तेव्हा विजयनगर साम्राज्य या प्रदेशात प्रबळ शक्ती नव्हते आणि त्यांना शेजाऱ्यांच्या शत्रू हल्ल्यांपासून स्वतःचा बचाव करावा लागे. श्री कृष्णदेवरायांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत अनेक लष्करी मोहिमा झाल्या. श्री कृष्णदेवरायाने इ. स १५०९ मध्ये दिवाणी येथे विजापूरच्या सुलतानाचा पराभव करण्यात यश मिळवले, त्यानंतर त्याने बिदर, गुलबर्गा आणि विजापूरवर आक्रमण केले.

श्री कृष्णदेवरायाने नंतर आपले लक्ष कोंडाविडूच्या रेड्डी, भुवनगरीचे वेलामा आणि उम्मतूर यांच्याकडे केन्द्रित केले, जे विजयनगर साम्राज्याचे सामंत होते. या सरंजामदारांनी वेळोवेळी सम्राटाविरुद्ध बंड केले, ज्यामुळे साम्राज्याच्या स्थिरतेला आतून धोका निर्माण झाला. उम्मतूरचा प्रमुख कावेरीच्या काठावर श्री कृष्णदेवरायाशी लढला व तो पराभूत झाला.

श्री कृष्णदेवरायाने भारताच्या विजयनगर साम्राज्यावर फक्त दोन दशके राज्य केले, तथापि ते त्यांची शक्ती, कौशल्ये आणि व्यक्तिमत्व च्या जोरावर अल्पावधीतच ओळखले गेले आणि त्याच्या लष्करी मोहिमेने साम्राज्याचा विस्तार केला, त्याला सत्तेचे स्थान बनवले. एक कुशल योद्धा असण्यासोबतच श्री कृष्णदेवराय हे चतुर मुत्सद्दी देखील होते. त्याच्या कारकीर्दीत भारताच्या पश्चिम किनार्‍यावर पोर्तुगीजांचे आगमन झाले होते. १५१० मध्ये गोवा भारताच्या पोर्तुगीज राज्याचे मुख्यालय बनले तेव्हा सम्राटाने परकीयांशी चांगले संबंध प्रस्थापित केले आणि त्यांच्या प्रजेमध्ये व्यापाराला प्रोत्साहन दिले.

पोर्तुगीज व्यापाऱ्यांमार्फत श्री कृष्णदेवरायाने बंदुका आणि अरबी घोडे मिळवले, ज्यामुळे साम्राज्याची लष्करी ताकद आणखी वाढली. शिवाय, साम्राज्याची राजधानी विजयनगरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी सम्राट पोर्तुगीजांच्या अभियांत्रिकी कौशल्याचा वापर करण्यास सक्षम होता.कारकिर्दीत श्री कृष्णदेवरायनी बांधलेल्या अनेक मंदिरांमध्ये या सम्राटाचे श्रेय असलेल्या हजारा राम मंदिर आणि विठ्ठलस्वामी मंदिर यांचा समावेश होतो, जे दोन्ही साम्राज्याच्या राजधानीत आहेत.

मंदिरे बांधण्या व्यतिरिक्त, सम्राटाने त्यांना उदार देणगी देखील दिली. उदाहरणार्थ, रत्नजडित सोन्याची तलवार आणि हिऱ्याने जडलेले मुकुट तिरुमला येथील व्यंकटेश्वर मंदिराला दान करण्यात आले.तसेच एक नवीन शहर, नागलापुरम,श्री कृष्णदेवरायाने त्यांच्या आईच्या सन्मानार्थ बांधले.श्री कृष्णदेवराय हे कलेचे, विशेषतः साहित्याचे संरक्षक होते. सम्राट हे संस्कृत, तेलगू, तमिळ आणि कन्नड यासह विविध भाषांच्या कवींचा संरक्षक म्हणून ओळखला जातो.

विजयनगरला त्याच्या शिखरावर नेल्यानंतर, श्री कृष्णदेवराय यांना वाटले की आता निवृत्त होण्याची वेळ आली आहे. त्याने इ. स १५२४ मध्ये ६ वर्षांचा आपल्या अल्पवयीन मुलाला श्री तिरुमलराया याला युवराज म्हणून नियुक्त केले. याला विजयनगर साम्राज्याचा दिवाण तिम्मारुसूने विरोध केला होता ज्यांना असे वाटले की मुलगा अजून लहान आहे.काही महिन्यांनंतर, एका कटामुळे तरुण मुलाला विष देऊन ठार मारण्यात आले आणि पंतप्रधान तिम्मारुसूवर युवराजावर विषप्रयोग केल्याचा आरोप करण्यात आला.

युवराजाला विषप्रयोग केल्याबद्दल पंतप्रधान तिम्मारुसूला व त्याच्या मुलांना दोषी ठरवण्यात आले. तिम्मारुसूच्याअसंख्य विनंत्या करूनही, तिम्मारुसूला दोषी घोषित करण्यात आले. शिक्षा म्हणून त्याच्या मुलांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आणि तिम्मारुसुला आंधळे करण्याची शिक्षा देण्यात आली. त्याचे पुत्र मारले गेले आणि तो खरोखरच आंधळा झाला.काही सूत्रांचे म्हणणे आहे की श्री कृष्णदेवराय यांनीच हा निकाल दिला. इतरांचे म्हणणे आहे की राजा खूप दुःखात होता आणि सुनावणीस उपस्थित राहू शकला नाही आणि राजाने तिम्मारुसुला स्वतःच्या वडिलांप्रमाणे वागवले म्हणून तिम्मरुसूचा मत्सर करणाऱ्या श्री कृष्णदेवरायांच्या नातेवाईकांनी हा निकाल दिला.

श्री कृष्णदेवराय तिम्मारुसूला नेहमी अप्पाजी म्हणून संबोधत तरीहि श्री कृष्णदेवराय तिम्मारुसूच्या क्रूर नशिबासाठी जबाबदार होते. पंतप्रधान आंधळे झाले होते. राजाला नंतर कळले की हा कट ओडिशाच्या गजपतींनी रचला होता ज्यांना त्यांच्या राजकन्येचे श्री कृष्णदेवरायशी लग्न करायचे नव्हते. पुढे ओरिसाचे गजपती विरोधात विजयनगर साम्राज्याच्या एकूण पाच लष्करी मोहिमा झाल्या आणि प्रत्येक वेळी गजपतींचा पराभव झाला.

अंतिम मोहिमेनंतर, ओरिसाच्या गजपती शासकाची मुलगी जगनमोहिनी हिचा विवाह श्री कृष्णदेवरायाशी झाला आणि ती तिसरी राणी बनली. श्री कृष्णदेवरायाने तिम्मारुसूला घडलेल्या प्रकाराबद्दल अप्पाजींकडे म्हणजे तिम्मारुसूकदे खेद म्हणून त्याला आर्थिक मदत देऊ केली.

तथापि, तिम्मारुसू, जो एक सन्माननीय व प्रतिष्ठीत व्यक्ती होता, त्याने आपल्या राजाकडून एक पैसाही स्वीकारण्यास नकार दिला व राजधानी सोडून तिरुपतीला गेला, जिथे त्याने आपले उर्वरित आयुष्य भगवान व्यंकटेश्वराच्या निवासस्थानी, भिकारी म्हणून खोल दारिद्र्यात घालवले.

इ.स १५२९ मध्ये, सम्राट गंभीर आजारी पडला आणि त्याच्या मृत्यूनंतर श्री अच्युतदेवराय, जो त्याचाच एक लहान सावत्र भाऊ, गादीवर आला व त्याबरोबर विजयनगर साम्राज्याचे वैभवाचे दिवस संपुष्टात आले आणि इ. स १५६५ मध्ये तालिकोटाच्या लढाईत स्वतः विजयनगर साम्राज्यास दुःखद नशिबाला सामोरे जावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT