Sinhagad Fort History: रात्रीच्या अंधारात कड्यावरून चढाई... तानाजी मालुसरे यांनी मुघलांचा पराभव करत कसा जिंकला कोंढाणा?

Sameer Amunekar

ऐतिहासिक नाव

सिंहगड किल्ल्याला पूर्वी ‘कोंढाणा’ या नावाने ओळखले जात असे. हा किल्ला पुण्याच्या नैऋत्येला सुमारे ३५ किमी अंतरावर वसलेला आहे.

Sinhagad Fort History | Dainik Gomantak

गौरवशाली इतिहास

हा किल्ला दोन हजार वर्षांहून अधिक जुना आहे. अनेक राजवटींनी यावर सत्ता गाजवली, पण मराठा साम्राज्याचा इतिहास येथे अधिक गडद आहे.

Sinhagad Fort History | Dainik Gomantak

अविस्मरणीय १६७० ची लढाई

छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या ताब्यात असलेला हा किल्ला परत मिळवण्यासाठी एक धाडसी मोहीम आखली होती.

Sinhagad Fort History | Dainik Gomantak

तानाजी मालुसरे यांचे शौर्य

या मोहिमेचे नेतृत्व पराक्रमी तानाजी मालुसरे यांनी केले. रात्रीच्या वेळी कड्यावरून चढाई करत त्यांनी किल्ल्यावर मराठ्यांचा ताबा मिळवला.

Sinhagad Fort History | Dainik Gomantak

"गड आला, पण सिंह गेला!"

तानाजी मालुसरे यांच्या बलिदानानंतर शिवाजी महाराजांनी काढलेले हे शब्द आजही प्रत्येक मराठी माणसाच्या काळजाला भिडतात.

Sinhagad Fort History | Dainik Gomantak

नामांतर

तानाजींच्या अतुलनीय पराक्रमाचा सन्मान म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ल्याचे नामकरण ‘सिंहगड’ असे केले.

Sinhagad Fort History | Dainik Gomantak

आजचा सिंहगड

आज हा किल्ला इतिहास प्रेमी आणि ट्रेकर्ससाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. इथून दिसणारे सह्याद्रीचे विहंगम दृश्य आणि थंड हवेचा अनुभव अविस्मरणीय असतो.

Sinhagad Fort History | Dainik Gomantak

पावसाळ्यात कोमट पाणी ठरते आरोग्याचा रामबाण उपाय

Monsoon Health Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा