Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Bori culvert railing damage: साकवावर अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे साकवाचा संरक्षक कठडा मोडून पडल्याने या ठिकाणी गंभीर स्वरुपाचे अपघात पडण्याची शक्यता निर्माण झाले आहे
Bori culvert railing damage
Bori Road Safety IssueDainik Gomantak
Published on
Updated on

बोरी: साकवावर अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे साकवाचा संरक्षक कठडा मोडून पडल्याने या ठिकाणी गंभीर स्वरुपाचे अपघात पडण्याची शक्यता निर्माण झाले आहे. बोरी पंचायत क्षेत्रातून जाणाऱ्या प्रमुख रहदारीच्या रस्त्यावर जो मोठा साकव आहे. त्या साकवाच्या दोन्ही बाजूचा भाग गंजून गेला आहे.

या साकवाच्या कठड्याच्या खांबावरील लोखंडी पाईप गंजली आहेत. आठ दिवसापूर्वीच या साकवाच्या कठड्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे या कठड्याचा एक खांब मोडून पडला आहे.

या रस्त्यावरून जाणारी वाहने बाजू देताना कठडा मोडलेल्या या साकवावरून नाल्यात पडण्याची दाट शक्यता आहे. ३० वर्षांपूर्वी या साकवाचा कठडा मोडून पडला होता. दै. ‘गोमन्‍तक’ने यासंबंधी वृत्त प्रसिध्द केल्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते विभागाने या कठड्याचे बांधकाम केले होते, परंतु आता या साकवाच्या कठड्यावर धडक दिल्यामुळे खांबाचे दगड पाण्यात पडले आहेत व पाईपही मोडून पडले आहेत.

Bori culvert railing damage
Goa Cricket Association: अनधिकृत क्रिकेट स्पर्धांत खेळणे महागात पडणार; 'जीसीए'चा नोंदणीकृत खेळाडूंना कडक इशारा

कठड मोडून उघड्या पडलेल्या भागावरून दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनांना बाजू देताना वाहने पडून गंभीर स्वरुपाचे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते विभागाने या नादुरुस्त बनलेल्या साकवाच्या कठड्याची नव्याने बांधकाम त्वरित करणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com