Fort History: शेषनागाचा भाऊ आणि राक्षसांचा संहार...! शूर राजपूत योद्ध्यांनी कसा राखला 'या' किल्ल्याचा बाणा? 300 वर्षांचा रक्तरंजित इतिहास

Manish Jadhav

भुज किल्ला

भुज किल्ला गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील भुज शहराच्या पूर्वेला असलेल्या भुजिया टेकडीवर (Bhujia Hill) वसलेला आहे. टेकडीवर असल्यामुळे या किल्ल्यावरुन संपूर्ण भुज शहराचे आणि आजूबाजूच्या परिसराचे अत्यंत विहंगम आणि सुंदर दृश्य दिसते.

Bhuj Fort | Dainik Gomantak

किल्ल्याची निर्मिती

भुजिया किल्ल्याचे बांधकाम कच्छचे शासक राव गोडजी (प्रथम) यांच्या काळात (1715-1718) शहराच्या संरक्षणासाठी सुरु करण्यात आले होते. मात्र, या किल्ल्याचे मुख्य बांधकाम आणि तटबंदीचे काम त्यांचे पुत्र महाराजा देशलजी (प्रथम) यांच्या राजवटीत पूर्ण झाले.

Bhuj Fort | Dainik Gomantak

भुजंग नागाचे पवित्र स्थान

या टेकडीच्या सर्वोच्च टोकावर 'भुजंग नाग' (नागदेवता) यांचे एक ऐतिहासिक मंदिर आहे. पौराणिक कथेनुसार, भुजंग नाग हा शेषनागाचा भाऊ होता, ज्याने कच्छ प्रांताला राक्षसांच्या त्रासातून मुक्त केले होते. याच 'भुजंग नागा'च्या नावावरुन या शहराचे नाव 'भुज' असे पडले.

Bhuj Fort | Dainik Gomantak

युद्धांचा साक्षीदार

भुजिया किल्ल्याने अनेक मोठी युद्धांचे प्रसंग अनुभवले आहेत. सिंधच्या शासकांनी आणि मुघल आक्रमकांनी या किल्ल्यावर ताबा मिळवण्यासाठी अनेक हल्ले केले, परंतु कच्छच्या शूर राजपूत योद्ध्यांनी हे सर्व हल्ले यशस्वीपणे परतवून लावले होते.

Bhuj Fort | Dainik Gomantak

भक्कम वास्तुकला आणि बुरुज

शत्रूच्या तोफांचा मारा सहन करण्यासाठी या किल्ल्याची तटबंदी अत्यंत जाड आणि मजबूत दगडांनी बांधण्यात आली आहे. किल्ल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी ठिकठिकाणी भव्य बुरुज आणि लपून मारा करण्यासाठी खास जागा तयार करण्यात आल्या आहेत.

Bhuj Fort | Dainik Gomantak

नागपंचमीचा भव्य उत्सव

दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी या किल्ल्यावर भव्य जत्रा भरते. या दिवशी संपूर्ण भुज शहरातून आणि कच्छ प्रांतातून स्थानिक लोक तसेच पर्यटक मोठ्या संख्येने भुजंग नागाच्या दर्शनासाठी आणि या जत्रेचा आनंद घेण्यासाठी किल्ल्यावर येतात.

Bhuj Fort | Dainik Gomantak

पर्यटन आकर्षण

सध्या हा किल्ला पर्यटकांसाठी एक उत्तम प्रेक्षणीय स्थळ आहे. किल्ल्याच्या वर जाण्यासाठी सुंदर पायऱ्यांची सोय करण्यात आली आहे. विशेषतः संध्याकाळच्या वेळी येथील सनसेट पॉईंटवरुन मावळता सूर्य पाहण्यासाठी आणि ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करतात.

Bhuj Fort | Dainik Gomantak

Mehrangarh Fort: साधूचा शाप, जिवंत बलिदान अन् 31 राण्यांचं सती जाणं...! मेहरानगढ किल्ल्याच्या 3 सर्वात भयंकर गोष्टी; काळजाचा ठोका चुकवणारा काळ

आणखी बघा