Savoi Verem Goa Village Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Savoi Verem: सफर गोव्याची! श्री अनंत देवाचं मनमोहक देऊळ आणि हिरवीगार कुळागरं लाभलेलं 'सावई-वेरे'

Savoi Verem Goa Village: निसर्ग सौंदर्याने बहरलेल्या फोंडा तालुक्यातील सावई-वेरे, हा माझा गाव. सावई-वेरे गावचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे श्री अनंत देवाचं सुंदर सुबक संपूर्ण पाण्यात वसलेलं मनमोहक देऊळ.

गोमन्तक डिजिटल टीम

निसर्ग सौंदर्याने बहरलेल्या फोंडा तालुक्यातील सावई-वेरे, हा माझा गाव. सावई-वेरे गावचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे श्री अनंत देवाचं सुंदर सुबक संपूर्ण पाण्यात वसलेलं मनमोहक देऊळ. गावच्या एका बाजूने उभा खामीण डोंगर दुसऱ्या बाजूने भूतखांब पठार, तिसऱ्या बाजूने मांडवी नदी. देवळाच्या सभोवती हिरवीगार कुळागरं, बागायती व शेती, त्यात पाण्याने भरलेलं सुंदर तळं, गावचा मुख्य उत्सव म्हणजे श्री अनंतदेवाचा काला. देवळात रोज गंधपूजा असते.

अनंताचा काला हा सख्याहरी नावाने गोव्यात तसेच गोव्याबाहेरही प्रसिद्ध आहे. पहिल्या दिवशी संध्याकाळी चार वाजता देवाची पालखी वाद्यांच्या सुरात व अभंग गायन करत श्री सातेरी शांतादुर्गा देवीला काल्यास निमंत्रण देते व सातेरी भाट येथे श्री शांतादुर्गा सातेरी देवीला आणि सावई येथे श्री लक्ष्मीनारायण देवाला निमंत्रण देऊन परत येताना,

लहान थोर लोक पोफळीची झाडे हातात घेऊन बेधुंद नाचत वाद्यांच्या तालावर हरी रे माझ्या पांडुरंगा, सख्याहरी माझ्या पांडुरंगा, या जयघोषात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी भाविकांकडून ओवाळणी घेत पालखी हळूहळू येते.

रांगोळी तसेच विद्युत रोषणाईने सजविलेली आकर्षक तोरणे उभारतात. सगळीकडे उत्साही व आनंदी वातावरण पसरलेले असते. पालखी देवळात पोहोचल्यानंतर दशावतारी काला होतो.

दुसऱ्या दिवशी सांगोड तथा तिसऱ्या दिवशी गरुडासन, चौथ्या दिवशी विजयरथ, पाचव्या दिवशी सिंहासन, सहाव्या दिवशी हत्ती अंबारी, सातव्या दिवशी शेवटी शेषासन. प्रत्येक दिवशी वाहनावर देवाची मिरवणूक काढली जाते.

गायनाची बैठक व त्या नंतर नाटक होत. शेवटी दशमीने काल्याची सांगता होते. पंधरा दिवसांनी श्री सातेरी शांतादुर्गा देवीचा काला चार दिवस चालतो. त्यात पहिल्या दिवशी पालखी दशावतारी काला, दुसऱ्या दिवशी रथ, तिसऱ्या दिवशी व्याघ्रासन, चौथ्या दिवशी मयुरासन, असे चार दिवस आसनातून देवीची मिरवणूक, भजन, गायन व नाटकं होतात.

सावई वेरे गाव कलाकारांची भूमी म्हटले तर वावगं होणार नाही. नाट्य कलाकार, भजनी कलाकार, क्रीडापटू पुष्कळ आहेत. त्याच प्रमाणे नाट्यसंस्था, भजनी संस्था, आरती मंडळ, महिला मंडळ, बालगोपाल आरती मंडळ, स्वयं साहाय्यक गट, मदनंत क्रिकेट क्लब, शांतादुर्गा स्पोर्ट्स क्लब आहे.

हे विविध कार्यकम उदाहरणात आरोग्य शिबिर, क्रिकेट स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा आयोजित करतात.

खेळाचे मैदान विविध खेळाडूंनी भरलेले असते. मदनंत क्रिकेट क्लब ची तर स्वतःची प्रशस्त वास्तू ‌आहे. त्यात बऱ्यापैकी हॉल, ऑफिस असून वर्षभर चांगले कार्यक्रम आयोजित करतात. गावात ग्राम पंचायत वाचनालय, धान्य सोसायटी, सरकारी बॅंक, सरकारी दवाखाना, दोन हायस्कूल, एक कृषी महाविद्यालय वगैरे आहेत. अशा माझ्या या गावाचा मला सार्थ अभिमान आहे.

प्रदीप गोपाळ वेरेकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT