Viral Post: "मी गोव्यात कुठे राहू"? Reddit वर रंगली धमाल चर्चा; नेटकरी म्हणाले, 'घरीच रहा आणि पैसे वाचव..'

Best place to live in goa: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘रेडिट’वर एका युजरने गोव्यात वास्तव्यासाठी कोणता भाग अधिक योग्य ठरेल, असा प्रश्न उपस्थित केला असून या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.
Best place to live in goa
Best place to live in goaDainik Gomantak
Published on
Updated on

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘रेडिट’वर एका युजरने गोव्यात वास्तव्यासाठी कोणता भाग अधिक योग्य ठरेल, असा प्रश्न उपस्थित केला असून या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. संबंधित युजरने दक्षिण गोवा की मध्य गोव्यातील पणजी परिसर — यापैकी कुठे राहणे अधिक सोयीचे ठरेल, याबाबत सल्ला मागितला आहे.

या पोस्टमध्ये त्याने काही विशिष्ट अपेक्षा नमूद केल्या आहेत. राहण्याच्या भागात फूड डिलिव्हरी सेवा उपलब्ध असावी, दैनंदिन गरजेच्या वस्तू सहज मिळाव्यात, चांगली इंटरनेट सुविधा असावी, भाडे किंवा राहणीमानाचा खर्च तुलनेने कमी असावा आणि बेळगावला जाण्यासाठी सोयीस्कर रस्ता जवळ असावा, अशा अटी त्याने मांडल्या आहेत. तसेच, तो मूळचा कर्नाटकातील कूर्ग भागातील रहिवासी असल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे.

या प्रश्नावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका युजरने थेट सल्ला देताना, “तू कूर्गमध्येच राहा आणि पैसे वाचव,” अशी उपरोधिक प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्या एका युजरने वाळपई परिसराचा पर्याय सुचवत, तुलनेने शांत आणि नैसर्गिक वातावरणाचा उल्लेख केला. मात्र, काही जणांनी अधिक माहितीची गरज व्यक्त केली.

Best place to live in goa
Viral Post: 'गोव्यात भारी वाटलं, परत निघताना मात्र त्रास का'? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल; बस, टॅक्सीवरती नेटकऱ्यांच्या कमेंट्स

“तुला नेमके गोव्यात का यायचे आहे? नोकरी, व्यवसाय की जीवनशैलीतील बदल? हे कळल्याशिवाय योग्य सल्ला देणे कठीण आहे,” असे एका प्रतिक्रियेत नमूद करण्यात आले.

Best place to live in goa
Viral Post: गोव्याच्या दुरवस्थेला कोण जबाबदार? Reddit पोस्टवर लोकांनी व्यक्त केलेली मतं वाचा

दरम्यान, या चर्चेमुळे गोव्यातील राहणीमान, वाढते भाडे, पायाभूत सुविधा आणि जीवनशैली यांवरही चर्चा रंगली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवरून स्थलांतराचे पर्याय शोधण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचेही या निमित्ताने दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com