Mhajyo Divchalchyo Yadi book review Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

'म्हज्यो दिवचलच्यो यादी' रवींद्र फोगेरींची स्मरणयात्रा

Mhajyo Divchalchyo Yadi book review: आपल्या वयाच्या ७५ च्या जवळ पोहचलेले प्रा. रवींद्र फोगेरी यांनी प्रकरणे १७ व्यक्तिमत्वे ५१ इतके विविध विषय ‘म्हज्यो दिवचलच्यो यादी’मध्ये हाताळले आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

अनंत दत्ताराम केळकर

घरात मुलांनी कोणत्याही कारणांसाठी हट्ट केला, तर घरातील मोठी माणसे तुझे नाव भट मास्तरांना सांगते, किंवा सांगतो, अशी तंबी द्यावयाचे. त्यांच्या कपड्यांसाठी पोर्तुगीजांनी त्यांना धाक दाखवला, परंतु भट मास्तर डगमगले नाहीत.

आपल्या वयाच्या ७५ च्या जवळ पोहचलेले प्रा. रवींद्र फोगेरी यांनी प्रकरणे १७ व्यक्तिमत्वे ५१ इतके विविध विषय ‘म्हज्यो दिवचलच्यो यादी’मध्ये हाताळले आहेत. फोगेरी यांचे जन्मवर्ष सन १९५१. त्यामुळे त्यांच्या स्मरणातील डिचोली शहर हे थोडेसेंच मुक्तीपूर्व काळातील दोन-तीन वर्षे आणि उर्वरित ६० वर्षे मुक्तीनंतरचे आहे.

त्यामुळे त्यांना मुक्तीपूर्व काळातील डिचोली शहर आणि आता मुळगांव या गावाला टेकलेले, बोर्डे व्यापलेले साखळीच्या जवळपास पोहचलेले महाकाय शहर यांच्यातील फरक जाणवतो. ते लिहितात (पृष्ठ१८ वर) मी ज्या डिचोलीविषयी लिहू इच्छितो ती पूर्वीची. तेव्हा महामायेच्या देवळानंतर घरे नव्हती, फक्त एकच घर होते, ते कोकणी लेखक, स्वातंत्र्यसैनिक आणि विचारवंत निकू बाबा (नीळकंठ) कारापूरकर यांचे घर.

त्या घरानंतरच्या पश्चिम दिशेच्या प्रदेशात जायला लोक भूतबाधेच्या भयामुळे घाबरत होते. निदान तरुणवर्गातील रवींद्र यांचा तसा समज करून देण्यात आला होता. भट मास्तर नानोडे गावातील गणेश नारायण केळकर जन्मवर्ष सन १९०८. यांचे स्वतःचे शिक्षण इयत्ता सातवी आणि डिचोली तेथील शांतादुर्गा विद्यालयात शिक्षक होते. ते मराठी माध्यमातील चौथ्या इयत्तेचे वर्गशिक्षकही होते. मठकर गुरूजी तिसऱ्या इयत्तेचे बेतकीकर दुसऱ्या इयत्तेचे आणि पोरोब इयत्ता पहिलीचे वर्गशिक्षक. त्याही पूर्वीची म्हणजे अपुरी (अपूरी) इयत्तेचा वर्ग होता.

त्याच्या वर्गशिक्षिका कुमुदबाई होत्या. भटमास्तर म्हणजे केळकर गुरुजी पांढरा शुभ्र पोशाख घालून यावयाचे. डोक्यावर गांधी टोपी, पांढरा शर्ट आणि धोतर हा त्यांचा जमानिमा होता. त्यांची शिस्त फार कडक होती. हातात छडी असे परंतु तिचा वापर फारच कमी करीत असत. त्यांचे डोळे पाहूनच विद्यार्थी घामाघूम होत असत. घरात मुलांनी कोणत्याही कारणांसाठी हट्ट केला, तर घरातील मोठी माणसे तुझे नाव भट मास्तरांना सांगते, किंवा सांगतो, अशी तंबी द्यावयाचे. त्यांच्या कपड्यांसाठी पोर्तुगीजांनी त्यांना धाक दाखवला, परंतु भट मास्तर डगमगले नाहीत.

ज्येष्ठ पत्रकार आणि मराठी तसेच कोकणीत विपूल लेखन करणारे रमेश सावईकर यांची या स्मृती शलाकेला प्रस्तावना लाभली आहे, ते लिहितात दिवचल म्हणजे डिचोली तालुक्याचे जुने नाव भतग्राम. त्या काळातील आठवणी सुध्दा प्रा.फोगेरी यांनी आपल्या पुस्तकात तपशीलवार दिलेल्या आहेत. मुक्तीपूर्व काळात मधूकर हरी नवाथे हे शालेय शिक्षक होते, रमेश बर्वे हे सहविद्यार्थी (वर्गमित्र) होते. नवाथे गुरूजी मराठी हा विषय शिकवीत असत.

ते शिस्तप्रिय होते. सुंदर चित्रे काढून शाळेत आणीत असत. साने गुरूजी कथामाला राष्ट्र सेवादल इत्यादींचा त्यांच्यावर प्रभाव होता. नवाथे गुरूजी महाभारत आणि रामायणातील प्रेरणादायक कथा सांगत असत. झांट्येबंधू या उद्योगपतीविषयी लिहिताना सन १९२८ यावर्षी कै. गणेश महादेव प्रभू झांटये यांनी डिचोली शहरात एक छोटासा काजू कारखाना सुरू केला आणि त्याचवर्षी अमेरिकेत काजूगर पाठविला. गोवा मुक्तीनंतर त्यांनी कारखाना आधूनिक केला.आता सन २०२६ या वर्षात झांट्ये यांची चौथी पिढी प्रवीण, रोहित आणि सिध्दार्थ कार्यरत आहेत.

त्यांना २०२५ या वर्षाचा ‘मेवा रत्न’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. स्वतःचे वडील विष्णू उर्फ भाऊ फोगेरी यांच्याविषयी लिहिताना ते कुटुंबवत्सल होते. अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. शेती हा व्यवसाय, त्याला दुग्ध व्यवसायाची जोड दिली आणि तो धंदा सचोटीने केला, असे सांगताना त्यांच्याशी सविस्तर विचारविनिमय झाला नाही त्याविषयी प्रा. फोगेरी खंत व्यक्त करतात.

फोगेरींच्या स्मरणयात्रेत अजित कडकडे, अमृत कांसार, बाबा कापडी, विष्णू कुंकळकर, कृष्णा माशेलकर, नरेश कडकडे, दत्तकुमार नायक असे विविध लोक आले आहेत. परंतु कृष्णा लक्ष्मण मोये आणि मनोहर बुवा शिरगांवकर आले नाहीत. दिवचलच्या सर्वण बाजूच्या विस्तारात मुस्लिम मित्र फकीर शेख आपसकर हेही भेटतात. अंततः प्रा. रवींद्र फोगेरी यांचे पुस्तक मुळातच वाचले पाहिजे. समीक्षा लेख हा फक्त ट्रेलरच ठरतो. -

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health And Motor Insurance Price Cut: सर्वसामान्यांसाठी खूशखबर! स्वस्त होणार हेल्थ आणि मोटर इन्शुरन्स; अवाजवी कमिशनला लागणार लवकरच ब्रेक

Horoscope 25 Saptember 2026: धनलाभाचा प्रबळ योग आणि यशाचा मार्ग खुला! लाडक्या बाप्पाला निरोप देताना उजळणार 'या' राशींचं भाग्य; ग्रह-नक्षत्रांची मोठी उलथापालथ

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT