Dhirio In Goa: गोव्यात हे काय चाललंय? 4 ठिकाणी 'धीरयो' झाल्याची बातमी; सुरावलीत बैल उधळून एक जखमी झाल्याची चर्चा

Benaulim Dhirio Bull Fight: बाणावली येथे सकाळी चार ठिकाणी, तर सुरावली येथे सायंकाळी एका ठिकाणी बैल आणि रेड्यांच्या झुंजी झाल्या.
Dhirio In Goa
Dhirio In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: रविवारी सुटीच्या दिवसाची संधी साधून सासष्टीत दरवेळा धीरयोंचे आयोजन केले जाते. रविवारही त्याला अपवाद नव्हता. बाणावली येथे सकाळी चार ठिकाणी, तर सुरावली येथे सायंकाळी एका ठिकाणी बैल आणि रेड्यांच्या झुंजी झाल्या.

सायंकाळी सुरावली येथे झालेल्या धीरयोवेळी एक बैल उधळून एकाला जखमी केल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी कोलवा पोलिसांकडे संपर्क साधला असता त्यांनी नेहमीप्रमाणे कानावर हात ठेवत, असे काही झाल्याची आम्हाला कल्पनाच नाही, असे सांगितले.

Dhirio In Goa
Benaulim Dhirio: बाणावलीत 2 दिवस खुलेआम धीरयोचा थरार! बघ्यांची तोबा गर्दी; पोलिस मात्र अनभिज्ञ

सायंकाळी सेंट बाप्टिस्ट चर्चजवळ असलेल्या शेतात या धीरयो लावल्या होत्या. यावेळी एकजण जखमी झाल्यावर ताबडतोब त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Dhirio In Goa
Dhirio in Colva: सुरावलीत पुन्हा धीरियोचा थरार, पोलिसांकडून FIR दाखल; Viral Video वरुन चर्चा..

बाणावली येथेही सकाळी चार ठिकाणी धीरयो झाल्याचे सांगण्यात आले. धीरयोंवर कायदेशीर बंदी असतानाही राजकारणी आणि पोलिसांच्या आशीर्वादाने या झुंजी सुरूच असून या झुंजी सुरू असताना बैल किंवा रेडा उधळल्याने कित्येकजण जखमी होतात. मागील वर्षी बाणावलीत एका रेड्याने छातीत शिंग खुपसल्याने एकाचा मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com