Childhood Depression Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Childhood Depression: स्मार्टफोन आणि नैराश्य

Smartphone Addiction: भारतात स्मार्टफोनचे व्यसन ही सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या बनत चालली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डॉ. संजय जानवळे (बालरोगतज्ज्ञ)

भारतात स्मार्टफोनचे व्यसन ही सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या बनत चालली आहे. ‘द लॅन्सेट जर्नल’च्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालात १२ वर्षाच्या आधी स्मार्टफोन वापरणाऱ्या मुलांना नैराश्याचा धोका वाढत असल्याचे नमूद केले आहे. त्याचबरोबर लहान वयात स्मार्टफोन मिळाल्याने लठ्ठपणाचा धोका लक्षणीयरित्या वाढतो आणि स्मार्टफोनच्या वापरांमुळे मुलांच्या झोपेची गुणवत्ता, कालावधी या दोन्हीवरही परिणाम होतो, असे म्हटले आहे.

मोबाईल व्यसनाची कारणे

मोबाईलवरच्या व्हिडिओ गेममधील विजयामुळे किंवा सोशल मीडियावर मिळालेल्या लाईक्समुळे डोपामाइन (आनंदी ठेवणारे हार्मोन) तयार होते, त्यामुळे पुनःपुन्हा मोबाइल वापरण्याची इच्छा होते. मुले रडत असतील किंवा जेवत नसतील तर पालक त्यांना शांत करण्यासाठी मोबाईल देतात. ही सवय मुलांना मोबाईलवर अवलंबून राहण्यास भाग पाडते. त्यातच मुले अडकून राहावीत अशा प्रकारे व्हिडियो गेम्स आणि सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म्सची रचना केलेली असते.

इतर मुले आपल्यापेक्षा जास्त आनंद जास्त आनंद घेत आहेत किंवा एखाद्या महत्त्वाच्या गोष्टींपासून आपण वंचित राहू, एखादी संधी गमावू अशी भीती म्हणजे फोमो (Fear Of Missing Out) या भीतीतून या मुले सतत मोबाईल चेक करत असतात. अनेकदा तणाव, कंटाळा किंवा एकाकीपणामुळे मुले भावनिक आधारासाठी मोबाईलकडे वळतात. आई-बाबा सतत मोबाईलवर असतील, तर मुले त्यांचेच अनुकरण करतात.

शास्त्रज्ञाच्या मते स्मार्टफोनमध्ये सोशल मीडिया पाहताना बरे वाटणारे (फील गुड) जे केमिकल्स स्रवतात, ते हेराॅईनसारख्या मादक पदार्थाहून अधिक तीव्र असतात. दीर्घकाळ स्मार्टफोनच्या अतिवापराने मेंदूत अनेक केमिकल लोचे होतात व त्यामुळे गॅमा- अमिनोब्युटीरिक ॲसिड (GABA) या न्युरोट्रान्स्मिटरचे प्रमाण कमीजास्त होते.

व्यसनाचे परिणाम

या व्यसनामुळे मुलांत चिडचिडेपणा, निद्रानाश, एकाग्रता कमी होणे, सर्जनशीलता कमी होणे, चिंताग्रस्ततेत वाढ होणे, आकलनशक्ती कमी होणे, ताणतणाव वाढणे, एकाकीपणा, नातेसंबधात दुरावा, नैराश्य यांसारखे मानसिक आजार, शारीरिक हालचाली कमी होणे, लठ्ठपणा हे स्मार्टफोन अतिवापराचे दुष्परिणाम आहेत.

हे दुष्परिणाम टाळायचे असतील तर सर्वप्रथम पालक म्हणून तुम्ही या व्यसनापासून दूर रहा आणि मोबाईलचा कमी वापर करून आदर्श निर्माण करा. अवतीभवती, तुम्ही राहता, काम करता तिथे मन रमवा. वाचनासारखे छंद जोपासा. वाहन चालवताना, जेवताना मोबाईल वापरू नका.

मुलांना असे ठेवा दूर

  दोन वर्षांखालील मुलांना अजिबात मोबाईल देऊ नका.

 मोठी मुले अभ्यासासाठी मोबाईल वापरत असतील तर स्क्रीन टाइम निश्चित करा.

मुलांचा छंद जोपासा. आउटडोअर गेम्स, चित्रकला, वाचन या गोष्टींचा प्रोत्साहन द्या.

  मुले तुमच्याशी संवाद साधतील,असे वातावरण तयार करा. तुम्हीही त्यांच्यासोबत खेळा, गप्पा मारा.

 डिजिटल डिटाॅक्स, घरातील कामात मदत (झाडांना पाणी देणे, वस्तू जागेवर ठेवणे) आणि झोपण्यापूर्वी एक तास स्क्रीन बंद करण्याचे नियम पाळा.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे,

मोबाईल वापराचे दुष्परिणाम मुलांना गोडीने समजावून सांगा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa U19 cricket: आदित्य कोटा, मिहीर कुडाळकरची अर्धशतके निष्फळ; पुदुचेरीचा गोव्यावर 110 धावांनी विजय

Couple Viral Video: बाईकच्या टाकीवर बायकोला बसवलं अन्... लाईक्स आणि व्ह्यूजसाठी जीवघेणा स्टंट; जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल

व्हाळशीच्या तळ्यात मगरींची दहशत, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; कुत्रे, लहान प्राण्यांवर हल्ले

Goa Fishermen: पावसापेक्षा चक्रीवादळाचीच धास्ती, समुद्राची स्थिती अनिश्चित; नव्या हंगामासाठी मच्छीमारांकडून तयारी

Jammu Kashmir Heavy Rain: जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा हाहाकार! पूर आणि भूस्खलनात 24 जणांचा मृत्यू; अमरनाथसह वैष्णोदेवी यात्रेला ब्रेक

SCROLL FOR NEXT