Goa Mansoon Tourism: दरीतून येणारा गार वारा अन् कोसळणाऱ्या धबधब्यांचा थरार; पावसाळी पर्यटनाचं नंदनवन मुंबई-पुण्याजवळचं 'हे' परफेक्ट डेस्टिनेशन

दैनिक गोमन्तक डिजिटल

स्वर्गीय अनुभूती!

पावसाळा सुरू होताच लोणावळा-खंडाळ्याचे डोंगर हिरवेगार होतात. हवेत पसर गारवा आणि डोंगरांवरून खाली उतरणारे पांढरेशुभ्र धुके पर्यटकांना एका वेगळ्याच जगात घेऊन जाते.

Goa Mansoon Tourism | Dainik Gomantak

निसर्गाचे विहंगम दृश्य

खंडाळा घाटातील राजमाची पॉईंटवरून पावसाळ्यात दिसणारा नजराणा थक्क करणारा असतो. इथून कोसळणारे धबधबे आणि दरीतून वाहणारे धुके पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात.

Goa Mansoon Tourism | Dainik Gomantak

भुशी डॅमचा थरार

लोणावळ्यातील भुशी डॅम हे पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण आहे. पावसाळ्यात जेव्हा हे धरण ओव्हरफ्लो होते, तेव्हा त्याच्या पायऱ्यांवरून वाहणाऱ्या पाण्यात भिजण्याचा आनंद काही वेगळाच असतो.

Goa Mansoon Tourism | Dainik Gomantak

टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट

तीव्र उंचावर असलेले हे पॉईंट्स पावसाळ्यात ढगांनी वेढलेले असतात. इथल्या कड्यावरून खोल दरीत कोसळणारे धबधबे पाहणे आणि गरमागरम कांदा भजी व भुट्टा (मका) खाणे हा पर्यटकांचा आवडता प्लॅन असतो.

Goa Mansoon Tourism | Dainik Gomantak

इतिहास आणि निसर्गाचा संगम

पावसाच्या रिमझिमत्या सरीत या प्राचीन बौद्ध लेण्यांचे सौंदर्य अधिकच खुलते. डोंगराच्या पायथ्यापासून लेण्यांपर्यंत जाताना वाटेत लागणारे छोटे-मोठे धबधबे ट्रेकर्सना आकर्षित करतात.

Goa Mansoon Tourism | Dainik Gomantak

पर्यटनाची गोड सांगता

लोणावळ्याला आल्यावर तिथली जगप्रसिद्ध मगनलाल चिक्की आणि चॉकलेट फज खाल्ल्याशिवाय ट्रीप पूर्ण होत नाही. पावसाळी वातावरणात इथल्या गरम चिक्कीची चव पर्यटकांची सफर अधिक गोड बनवते.

Goa Mansoon Tourism | Dainik Gomantak

मुंबई-पुण्यापासून हाकेच्या अंतरावर

लोणावळा-खंडाळा ही दोन्ही ठिकाणे मुंबई आणि पुणेकरांसाठी अगदी जवळ आहेत. एक्सप्रेसवेमुळे अवघ्या २ तासांत इथे पोहोचता येत असल्याने, शनिवार-रविवारच्या सुट्टीत वन-डे ट्रिपसाठी हा सर्वोत्तम पर्याय ठरतो.

Goa Mansoon Tourism | Dainik Gomantak

रोजच्या जगण्यातील 'या' मानसिक बदलांना हलक्यात घेऊ नका, वेळीच ओळखा लक्षणे

Mental Health Awareness | Dainik Gomantak
आणखी बघा