सर्वेश बोरकर
तुळुनाडूच्या इतिहासात प्राचीन काळापासून राज्य करणाऱ्या घराण्यांपैकी आलुप हे सर्वात महत्वाचे घराणे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा एक हजार वर्षांहून अधिक काळापासूनचा इतिहास आपल्याला सापडतो. आलुपांची भूमी आलवखेडा ग्रीक लोकांना ओलोखोइरा म्हणून ओळखली जात असे. कन्नड शिलालेखांपैकी सर्वात जुने हल्मिडी शिलालेख बहुधा आलुप घराण्याशी संबंधित आहेत, अशी एक मान्यता आहे.
अलिकडेच सापडलेल्या गुडनापूर शिलालेखात, जो इसवी सनाच्या सहाव्या शतकात लिहिला गेला आहे, तो कदंब शासक रविवर्माच्या अधीनस्थांनापैकी एक म्हणून आलूप शासकाचा उल्लेख सापडतो. आलूपांनी सुरुवातीच्या काळापासून स्वतःला सत्तेत स्थापित केले होते आणि बहुतेकदा, कर्नाटक अधिपतींना स्वेच्छेने अधीनता दाखवून, विजयनगर साम्राज्याच्या स्थापनेपर्यंत ते होते. असे म्हटले जाते, की दक्षिण कर्नाटक जिल्हा आणि उत्तर कर्नाटक जिल्ह्याचा गोकर्णपर्यंतचा किनारी प्रदेश त्यांच्या राज्यात समाविष्ट करण्यात आला होता.
ज्या राजकीय उलथापालथींना आलुपा शासक बळी पडले त्यानुसार, त्यांची राजधानी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आली. मंगळपुरा (मंगळूरु) ही त्यांची पहिली राजधानी असावी. ८ व्या शतकात त्यांनी उदयपुरा (उद्यावर) हे त्यांचे राजकीय केंद्र म्हणून निश्चित केल्याचा उल्लेख सापडतो. त्यानंतर, बाराकुरू हे अधिकाराचे केंद्र होते आणि पुन्हा एकदा, कदाचित, ११ व्या ते १३ व्या शतकापर्यंत, मंगळपुरा (मंगळूरु) त्यांच्या कायदेशीर अधिकाराचे केंद्र बनले आणि ते त्यांच्या राजकीय सत्तेच्या शेवटपर्यंत त्यांचे स्थान राहिले. कर्नाटक अधिपत्याचे (बनवासीचे कदंब, बादामीचे चालुक्य, मान्यखेताचे राष्ट्रकूट, कल्याणचे चालुक्य, द्वारसमुद्राचे होयसळ आणि विजयनगरचे राय) या विविध राजघराण्याचे ते सामंत होते. तुळु-नाडूची संस्कृती कर्नाटक सांस्कृतिक संकुलाचा भाग होती.
आळू या शब्दाचा अर्थ ‘राज्य’ असा होतो ,कदाचित या घराण्याच्या जनकाचे नाव आळूप किंवा अलुव असावे आणि संपूर्ण घराण्याला अळूप राजवंश म्हटले जाऊ लागले असल्याचे मानले जाते. डॉ. बी. ए. सालेतोर आणि एम. गोविंद पै सारख्या काही विद्वानांच्या मते आळूक हा शब्द शेष (सर्पांचा राजा) शी संबंधित असावा. सुमारे इसवी सन ४५० चा काकुष्ठवर्मनचा हल्मिडी शिलालेख आतापर्यंत सापडलेल्या कन्नड शिलालेखांपैकी सर्वात जुना मानला जातो. असे म्हटले जाते की या शिलालेखात उल्लेख केलेला आलाप दक्षिण कानडा जिल्ह्यातील आळूपासशी संबंधित असुही शकतो. उडुपी तालुक्यात सापडलेल्या राजवंशाच्या दोन सर्वात जुन्या शिलालेखांवरून या वस्तुस्थितीची पुष्टी होते. ८०० च्या सुमारास राष्टकूट राजा गोविंदारासुच्या सोराबा शिलालेखात आपल्याला प्रथमच आलवखेडा हे नाव ६,००० गावातील भौगोलिक विस्तारासह आढळते.
धारवाड जिल्ह्यातील बंकापुरा तालुक्यातील निदुगुंडीला असलेल्या ९ व्या शतकातील आणखी एक शिलालेख, इंदापय्य बनवासीवर राज्य करत असताना जमिनीच्या काही भेटवस्तूंची नोंद करतो. त्यात आलवखेड ६,००० चा देखील उल्लेख आहे व आलवखेड हा एक वेगळा राजकीय विभाग म्हणून इ.स. ९ व्या शतकापर्यंत ओळखला जात असावा. कोंकणाच्या दक्षिणेस आणि केरळच्या उत्तरेस आळुप हे राज्य होते. अल्वाखेडा हा प्रादेशिक विभाग,होयसळ काळापर्यंत त्याच नावाने ओळखले जात असावा. होयसळ राजा विष्णुवर्धनाच्या काळातील एका शिलालेखात आलवखेडा-६,००० येथील लोकांचा उल्लेख आहे. या काळात देशाला वारंवार आळवखेडा आणि त्यांच्या अधिपत्याची पश्चिम सीमा म्हणून संबोधले जात असे.
आलवखेडाचा विस्तार उत्तर कानरा जिल्ह्याच्या काही भागांवर, ज्यामध्ये हैवे गावाचा समावेश आहे, पांड्य-चक्रवर्ती शंकर पांड्य यांच्या कारकिर्दीतील शिलालेख, १३४८ रोजी होन्नावरा तालुक्यातील इडागुंडी येथील महाप्रभु नारायण सर्वतीथ्य यांनी बनवलेल्या जमिनींमधील धार्मिक स्थापनेचे वर्णन करतो. १३०४ च्या उत्तर कन्नडा येथील भटकळ सिराली शिलालेखात चक्रवर्ती अरिराय-बसव-शंकर वीर-अजयदेवरस यांनी दिलेल्या भेटवस्तूचा उल्लेख आहे. १३३४ च्या याच शिलालेखाच्या दुसऱ्या भागात आळूप शासक सोयिदेवाच्या कारकिर्दीत आणखी एक भेटवस्तू नोंदवली आहे. बाराकुरुचा राजा वीर-कुलशेखर देवरस याने त्याच्या मंत्र्यांसोबत मिळून आदेश जारी केले होते, ज्यामध्ये शिराळेच्या लोकांकडून त्याच्या बिदाराचा वापर सुरू ठेवण्याची घोषणा केली होती.
विजयनगर राजवटीच्या आगमनापूर्वी, दक्षिण कन्नडा जिल्हा आणि उत्तर कानरा (विशेषतः भटकळ आणि होन्नावरा तालुके) च्या किनारी प्रदेशांचा समावेश असलेला पश्चिम किनारपट्टीचा भाग आलुपांच्या ताब्यात होता आणि शिलालेखांमध्ये उल्लेख केलेला अलवखेडा हा किनारी प्रदेश होता जीथे आलुपांनी मुख्य आणि समवर्ती शाखांद्वारे आपलीसत्ता कायम केली.पुरातत्वशास्त्रज्ञांना अलुपा राजवंशाशी संबंधित एक दुर्मिळ शिलालेख सापडला, जो अलुपा राजाच्या मृत्यू्या संदर्भात आहे. तुळुवा इतिहास आणि संस्कृतीच्या (आधुनिक कर्नाटकातील) अभ्यासात या सोमेश्वर शिलालेखाला खूप महत्त्व आहे. हा शिलालेख ११ व्या शतकात गुजरातच्या सोम शर्मा यांनी स्थापन केलेल्या सोम पंथाच्या स्थापनेशी संबंधित आहे, जो नंतर संपूर्ण भारतात पसरला.
सोमेश्वरातील सोमेश्वर मंदिर कुलशेखर अलुपेंद्रच्या कारकिर्दीत सोम शर्माच्या सन्मानार्थ बांधले गेले होते आणि ते नवदुर्गाच्या शिल्पांनी सजवले गेले होते. दक्षिण कन्नडामधील आलुपाचा एक प्रसिद्ध शासक कुलशेखर अलुपेंद्र पहिला याचे चित्रण आहे, ज्यामध्ये तो तलवार घेऊन एका विशिष्ट स्थितीत उभा आहे. कुलशेखर अलुपेंद्र या शासकाना अजूनही नवीन शहर स्थापन करण्यासाठी, या प्रदेशात पाळले जाणारे मंदिर प्रशासन नियम स्थापित करण्यासाठी आणि तुळु भाषा आणि संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी ओळखले जाते. त्याने ११५६ ते १२१५ पर्यंत तुळुनाडूवर राज्य केले आणि हा शिलालेख, जरी तारीख स्पष्टनसलीतरी, पुरालेखशास्त्राच्या आधारे १२ व्या शतकातील असल्याचे सिद्ध होते.