

पणजी: राज्यात काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला होता. दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उष्माही जाणवत होता; परंतु शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे काही प्रमाणात पावसाची तीव्रता वाढल्याचे गोवा वेधशाळेचे संचालक नहुष कुलकर्णी यांनी सांगितले. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुढील दोन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.
आज सकाळपासूनच राज्याच्या सर्वच भागांत चांगला पाऊस पडला. वाऱ्याची तीव्रताही अधिक जाणवत होती. मागील २४ तासांत राज्यात सरासरी ५.६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. आतापर्यंत राज्यात सुमारे ३१ टक्के पावसाचा तुटवडा कायम आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.