

पणजी: ‘मी अपक्ष होतो, भाजपमध्ये आपण मतदारांना विचारून आलो आहे. त्यामुळे बाहेरून कोण भाजपमध्ये आले आणि मंत्री झाले, या टीकेचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही,’ अशा शब्दांत पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी भाजपचे माजी मंत्री निलेश काब्राल यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मंत्री खंवटे यांनी भाजप प्रवेशाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचा दावा केला आहे. भाजपच्या डबल इंजिन सरकारचा गोव्याला मोठा फायदा झाला आहे. राज्यात पायाभूत सुविधा, पर्यटन व इतर क्षेत्रांत विकास झाला आहे. विरोधक त्यांचे काम करतात, आम्ही आमचे काम करतो, असे सांगत विरोधकांच्या म्हणण्याला जास्त महत्त्व देत नसल्याचे दाखवून दिले.
पर्वरी उड्डाणपुलाचा सर्वाधिक फायदा स्थानिक पर्वरीवासीयांना मिळायला हवा, असे आपले ठाम मत आहे. पुलाच्या बांधकाम काळात पर्वरीतील नागरिकांना धूळ, वाहतूक कोंडी आणि इतर समस्यांना तोंड द्यावे लागले. उड्डाणपुलाची काही प्रवेशद्वारे बंद करण्यात आली आहेत, ती पुन्हा सुरू करण्याकरिता बैठक घेण्यात आली असून, त्यावर योग्य नियोजन करूनच तोडगा काढला जाईल.
वाहनचालकांची सुद्धा जबाबदारी
उड्डाणपूल खुला झाल्यानंतर अतिवेगामुळे अपघात झाला, त्यावर ते म्हणाले, प्रत्येक अपघातासाठी सरकारलाच जबाबदार धरणे योग्य नाही. सरकार नागरिकांच्या सोयीसाठी सुविधा तयार करते. मात्र, त्याचा वापर सुरक्षितपणे व जबाबदारीने करण्याची जबाबदारी वाहनचालकांची आहे, असेही त्यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.