IND vs AUS: गोव्याच्या 18 वर्षीय व्यंकटचे युवा वनडे पदार्पण दिमाखात; ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या विजयात घेतली कर्णधाराची महत्त्वाची विकेट

Chigurupati Venkat Youth ODI Debut: ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध यजमानांनी सात धावांनी विजय मिळविला, त्यात व्यंकटने एक विकेट प्राप्त केली.
Chigurupati Venkat Youth ODI Debut
IND vs AUSDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याचा १८ वर्षीय प्रतिभाशाली वेगवान गोलंदाज चिगुरुपती व्यंकट याने शुक्रवारी राजकोट येथील निरंजन शाह स्टेडियमवर भारताच्या १९ वर्षांखालील संघातून युवा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध यजमानांनी सात धावांनी विजय मिळविला, त्यात व्यंकटने एक विकेट प्राप्त केली.

राजकोटमधील पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी २० षटकांचा खेळविण्यात आला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १८२ धावा केल्यानंतर ऑस्ट्रेलियाला ७ बाद १७५ धावांत रोखले. व्यंकट याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जॅक झोस्नेक (५५ धावा) याचा महत्त्वपूर्ण बळी घेताना ३ षटकांत ३९ धावा मोजल्या. नव्या चेंडूने त्याने डावाची सुरवात केली.

Chigurupati Venkat Youth ODI Debut
Iron Ore Mining Goa: कोडली खाणीला पर्यावरणीय मंजुरीपूर्वी मोठी सुनावणी; 377 हेक्टर क्षेत्रात 35 लाख टन लोहखनिज उत्खननाचा प्रस्ताव

भारताच्या १९ वर्षांखालील संघातून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा व्यंकट हा सौरभ बांदेकर व हेरंब परब यांच्यानंतरचा तिसरा गोमंतकीय युवा क्रिकेटपटू ठरला. विशेष बाब म्हणजे, तिघेही वेगवान गोलंदाज आहेत.

व्यंकट याने यावर्षी जुलैमध्ये कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंका १९ वर्षांखालील संघाविरुद्ध भारतातर्फे युवा कसोटी (मल्टि-डे) क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्या सामन्यात त्याने दोन्ही डावांत मिळून पाच गडी बाद केले होते. ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आणखी दोन सामने बाकी आहेत.

Chigurupati Venkat Youth ODI Debut
Goa Politics: निंबाळकरांची 'ती' पोस्ट काही तासांत डिलीट; सरदेसाईंवरील टीकेनंतर राजकीय चर्चेला उधाण, 'गोवा फर्स्ट'वर निशाणा

सेहवाग यांच्या मुलाचाही पहिला सामना

ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील संघाविरुद्ध भारताचा महान क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यांचा मुलगा आर्यवीर सेहवाग यानेही १९ वर्षांखालील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने सलामीला फलंदाजी करताना २८ धावा केल्या. या सामन्यात महान फलंदाज राहुल द्रविड यांचा मुलगा यष्टिरक्षक अन्वय द्रविड (१८ चेंडूंत ३८ धावा) हा सुद्धा खेळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com