Goa Liberation Day Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

Goa liberation memories: आज आपण मुक्तपणे गोव्यात स्वातंत्र्य उपभोगत असताना, स्वातंत्र्यसैनिकांनी काय हाल सोसले, याचे बरेचदा स्मरण होत नाही. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी हे आम्ही गोमंतकीय विसरतो आहोत.

गोमन्तक डिजिटल टीम

चौथ्या दिवशी आम्ही एडनच्या जवळपास पोचलो होतो, दुरून तिथला किल्लाही दिसत होता, त्याच दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी आम्ही ’सुखतारा’ किंवा ’सोकोतोरा’ या छोट्याशा बेटाजवळ पोचलो होतो. तेथील उंचच उंच दीपगृह लगेच लक्षात भरून राहते. तेथे पोचल्यापासून आजूबाजूस पण फार लांबवर सोमाली मच्छीमाऱ्यांच्या होड्या समुद्रावर डुलताना दिसत.

याच भागात मी एका मोठ्या अपमृत्यूतून बचावलो होतो. भयंकर उकाडा होत असल्यामुळे संध्याकाळच्या जेवणानंतर बोटीतील बहुतेक सर्व उतारू डेकवर वारा घेत पहुडले होते. मीही कोपऱ्यातल्या पण कठडयाजवळच्या एका छोटयाशा प्लॅटफॉर्मवर आडवा झालो होतो. बऱ्याच वेळाने बहुतेक सर्व मंडळी खाली आपापल्या झोपायच्या जागेत गेली होती. मी एकटाच डेकवर त्या प्लॅटफॉर्मवर वारा खात राहिलो होतो.

मला झोपही लागली असावी. काही वेळाने बोट बरीच हलू लागली. मी ज्या जागी झोपलो होतो तेथे कठड्याची वरची कांब केवळ दीड-दोन वितीइतकीच उंचीवर होती. अशा परिस्थितीत मी तेथे तसाच झोपेत गुंग होऊन राहिलो असतो, तर नक्कीच समुद्रात फेकला गेलो असतो आणि माझे काय झाले ते कोणाला कळलेही नसते. मी लगेच ताबडतोब तेथून उठून खाली तळघरात जाऊन खाटेवर झोपलो.

एडन काढल्यानंतर आम्ही बाबेल मांदेब सामुद्रधुनीतून तांबड्या समुद्रात शिरलो. आतापर्यंत, त्यामानाने फारच विशाल अशा महासागरीय समुद्रांतून आमचा प्रवास चालला होता. तांबडा समुद्र त्या मानाने लांबोडका पण बराच अरुंद.

त्यामुळे अस्पष्ट का होईना बोटीतून डाव्याउजव्या म्हणजे पश्चिम व पूर्व या दोन्ही किनाऱ्यांवरील निदान डोंगर तरी दिसत असत. सुखताराच्या आसपास पोचल्यापासून मी तरी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच ’उडती मासळी’ (फ्लाइंग फिश) पाहत होतो.

हल्ली मात्र गोव्यात इंजिनवर चालणाऱ्या मच्छीमार बोटी अस्तित्वात आल्यापासून ही ’उडती मासळी’ अधूनमधून बाजारातही आलेली दिसते. पुढे तांबडया समुद्राच्या भर मध्यभागी जेदाहच्या जवळ आणली एक बेट मागे टाकून पुढे गेल्यावर आम्ही सिनाय किंवा सायनाय द्वीपकल्पाच्या पश्चिम बाजूच्या सुएझ उपसागरांतून सुएझ कालव्यात शिरलो. सुएझ उपसागर चिंचोळा असाच आहे. त्यामुळे त्याच्या दोन्ही किनाऱ्यांवरील वाळवंटी प्रदेश स्पष्टपणे दिसत होता.

सुएझ बंदरात पोचल्यावर आम्हाला पुन्हा तळघरात बंद करण्यात आले. पण पोर्ट होलमधून अधूनमधन आम्हाला सुएझ कॅनालच्या दोन्ही बाजूंची सृष्टी दिसत होती. त्यात खजुरीची झाडे प्रामुख्याने असत. हा कॅनालमधला प्रवास दीडेक दिवस चालला व आम्ही पोर्ट सय्यदला पोचलो. इजिप्तमध्ये नुकतीच क्रांती झाली होता.

राजे फरुकची राजवट नष्ट झाली होती. पोर्ट सय्यद बरेच गजबजलेले बंदर होते. कॅनॉलच्या दोन्दी किनाऱ्यांच्या दरम्यान पुष्कळ फेरीबोटी चालत होत्या. त्या बंदरात आम्ही एक रात्र काढली. आमच्या बोटीवर हाज यात्रेसाठी सिंगापूरहून आलेला एक मुस्लिम गृहस्थही होता. कारण ’इंदिय’ ही बोट माकावहून मुरगावला आली होती. तो बिचारा, पॉर्क पोटात जाण्याच्या भीतीने बोटीवर शिजवलेले कोणतेही अन्न न घेता फक्त फळफळावळच खात होता. तो सुएझ बंदरात उतरला होता.

(लेखक : अ‍ॅड. पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Video: हार्दिकच्या धडाकेबाज खेळीवर गर्लफ्रेंड फिदा! सोशल मीडियावर रंगली 'फ्लाइंग किस'ची चर्चा; मैदानावरच प्रेमाचा वर्षाव

IND vs SA 5th T20: अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याचं वादळ, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक; अभिषेक शर्माचा मोडला रेकॉर्ड VIDEO

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

VIDEO: गोव्यात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली पर्यटकांची लूट! कळंगुट, बागा किनाऱ्यावर ट्रान्सजेंडरचा वावर, महिलेने उघड केला धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT