Goa ZP Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्‍या! जिल्‍हा पंचायत निवडणुकीसाठी 8,69,356 मतदार बजावणार हक्क; 5 तृतीयपंथीय मतदार रिंगणात

Goa Zilla Panchayat Election: जाहीर प्रचार संपुष्‍टात आल्‍याने उमेदवारांसह निवडणुकीच्‍या रिंगणात असलेल्‍या पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवार गुप्‍त भेटींच्‍या माध्‍यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्‍याचा प्रयत्‍न करतील.
Goa ZP Election
Goa ZP ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : शनिवारी होणाऱ्या जिल्‍हा पंचायत निवडणुकीत ८,६९,३५६ मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. यात उत्तर गोव्‍यातील ४,४०,१९९ आणि दक्षिण गोव्‍यातील ४,२९,१५७ मतदारांचा समावेश आहे.

उत्तर गोव्‍यात सर्वाधिक मतदार सुकूरमध्‍ये, तर सर्वांत कमी मतदार पाळी मतदारसंघांत आहेत. तर, दक्षिण गोव्‍यात सर्वांत जास्‍त मतदार सांकवाळमध्‍ये असून, सर्वांत कमी मतदार उसगाव–गांजे मतदारसंघात आहेत.

या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान होईल. भाजप, काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, मगोप, आप, रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स, तृणमूल काँग्रेस, राष्‍ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पक्षांसह अपक्ष मिळून २२६ उमेदवार निवडणुकीच्‍या रिंगणात आहेत.

Goa ZP Election
ZP Election 2025: सावर्डेत मोहन, आतिष यांच्यात थेट लढत; आरजी, काँग्रेस रिंगणात, आमदार गणेश गावकर यांची प्रतिष्ठा पणाला

या उमेदवारांचे भवितव्‍य शनिवारी मतपेट्यांमध्ये बंद होणार असून, त्‍याचा निकाल सोमवारी जाहीर होणार आहे. जाहीर प्रचार गुरुवारी सायंकाळी ५ वाजता संपुष्‍टात आल्‍याने उमेदवारांसह निवडणुकीच्‍या रिंगणात असलेल्‍या पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवार रात्री आणि शुक्रवारी गुप्‍त भेटींच्‍या माध्‍यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्‍याचा प्रयत्‍न करतील.

Goa ZP Election
ZP ELection 2025: प्रचाराचा आज अखेरचा दिवस, भाजप, काँग्रेसच्‍या दिग्गजांकडून 'पायाला भिंगरी'

पाच तृतीयपंथीय मतदार

जिल्‍हा पंचायत निवडणुकीत उत्तर गोव्‍यातील तीन आणि दक्षिण गोव्‍यातील दोन असे मिळून पाच तृतीयपंथीय मतदानाचा हक्‍क बजावणार असल्‍याचे राज्‍य निवडणूक आयोगाने जारी केलेल्‍या आकडेवारीतून स्‍पष्‍ट होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com