IFFI Country Focus Dainik Gomantak
मनरिजवण

IFFI Country Focus: इफ्फी 'कंट्री फोकस'साठी जपानची निवड, कोणत्या खास फिल्म्स असणार; पहा..

IFFI 2025 Goa: भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील 'कंट्री फोकस' हा महत्त्वाचा विभाग आहे. या विभागात दरवर्षी विशिष्ट देशातील समकालीन आणि अभिजात चित्रपट प्रदर्शित केले जातात.

गोमन्तक डिजिटल टीम

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील 'कंट्री फोकस' हा महत्त्वाचा विभाग आहे. या विभागात दरवर्षी विशिष्ट देशातील समकालीन आणि अभिजात चित्रपट प्रदर्शित केले जातात. या विभागात प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांमुळे त्या त्या देशातील, त्यांच्या सिनेमॅटिक उत्कृष्टतेवर प्रकाश पडतो आणि एक प्रकारच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना मिळते.  यंदाच्या ५६व्या इफ्फीमध्ये कंट्री फोकस या विभागासाठी जपानची निवड झाली आहे. जपानी सिनेमाचा एक व्यापक आढावा या विशेष सिनेमांमधून प्रेक्षकांना घेता येईल. 

टायगर 

दिग्दर्शक: अंशुल चौहान 

जपानमधील एलजीबीटीक्यू समुदायावर हा चित्रपट आधारलेला आहे. समलिंगी मालिश करणारी ३५ वर्षीय कावागुची ही व्यक्ती  या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा आहे. त्याचे वडील आजारी पडल्यानंतर त्याची बहीण त्याची लैंगिकता उघड करेन अशी धमकी देऊन आपले वारसा हक्क सोडण्यास त्याला उद्युक्त करते. यंदाच्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘व्हिजन- आशिया’ या विभागात या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर झाला होता.

कॅचिंग द स्टार्स ऑफ धीस समर 

दिग्दर्शक: कान यामामोटो

कोविड-१९ च्या काळात ऑनलाईन खगोलशास्त्र क्लबद्वारे एकमेकांशी जोडल्या गेलेल्या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची कहाणी हा चित्रपट सांगतो. इबाराकी आणि गोटो बेटांवरील विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या सहकार्याने सुरू झालेला हा उपक्रम देशात पसरतो आणि त्यामुळे अनपेक्षित चमत्कार घडतो.

टू सीजन्स, टू स्ट्रेंजर्स 

दिग्दर्शक: शो मियाके

योशिहारू त्सुंगे यांच्या ‘अ व्यू ऑफ द सी साईड’ आणि ‘मिस्टर बेन अँड हिज ईग्लू’ या लघुकथांवर आधारित हा चित्रपट आहे.‌ ही एका पटकथा लेखकाची कहाणी आहे, जी तिच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींची प्रक्रिया समजून घेण्याच्या प्रयत्नात आहे. यंदाच्या लोकांर्नो चित्रपट महोत्सवातील मुख्य स्पर्धा विभागात या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर झाला आणि या चित्रपटाने गोल्डन लेपर्ड पुरस्कार जिंकला. 

अ पेल व्ह्यू ऑफ हिल्स 

दिग्दर्शक: केई इशिकावा 

काझुओ इशिगुरो यांच्या कादंबरीवर हा चित्रपट आधारलेला आहे. एका विधवेच्या स्मृतीतील १९५०च्या दशकातील जपान आणि १९८० च्या दशकातील इंग्लंड यावर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सवात ‘अन सर्टेन रिगार्ड’ या विभागात या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर झाला होता. 

डियर स्ट्रेंजर 

दिग्दर्शक: तेत्सुया मारिको 

हा चित्रपट अमेरिकन स्थलांतरितांमधील विश्वास आणि दुःख या भावनांचा शोध घेते. एक जपानी पुरुष आणि त्याची तैवानी अमेरिकन पत्नी यांच्यामधील बहुसांस्कृतिक विवाह ही याच चित्रपटातील कथानकाची पार्श्वभूमी आहे. यंदाच्या टोकियो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 'सिनेमा नाऊ' या विभागात या चित्रपटाचा विशेष खेळ झाला होता.

सी साईड सेरेंडिपिटी 

दिग्दर्शिका: साटोको योकोहामा

हा मुलांसाठी निर्माण केलेला चित्रपट आहे. या चित्रपटात किनारपट्टीवरील गावाचे चित्रण करण्यात आले आहे जे कलाकारांना आकर्षित करत असते.‌ या गावात मुले आणि प्रौढ एका रहस्यमय गोष्टीत सामील झालेली असतात. बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा जनरेशन के प्लस विभागात या चित्रपटाची निवड झाली होती. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात होणार 'WAVES फिल्म बाजार' चे उद्घाटन! 22 फीचर फिल्म; मराठी, कोकणी संस्कृतसह 18 हून अधिक भाषांतील कथा होणार सादर

Goa ZP Election: कवळे जिल्हा पंचायतवर मगोपचे वर्चस्व, काँग्रेसची भूमिका अस्पष्ट; एकतर्फी लढत होण्याची दाट शक्यता

'भारतामुळेच माझ्या आईचा जीव वाचला!' शेख हसीनांच्या मुलानं पंतप्रधान मोदींचे मानले आभार; बांगलादेश सरकारवर केले गंभीर आरोप

International Mens Day: मुलाने विचारले 'आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा स्त्री दिनाप्रमाणे लोकप्रिय का नाही?’ तेंव्हा वडील म्हणाले.....

Baina: चोरांनी केली मारहाण, तरीही खिडकीतून पळाली! बायणा दरोड्यात 15 वर्षीय मुलीने वाचवले कुटुंबाचे प्राण; पुरस्कारासाठी शिफारस

SCROLL FOR NEXT