Poonam Dubey Weds Gaurav Jain Dainik Gomantak
मनरिजवण

Poonam Dubey Wedding: भोजपुरी अभिनेत्री पूनम दुबेने 35 व्या वर्षी गोव्यात केले लग्न, CM योगींनी फोन करुन दिल्या शुभेच्छा

Poonam Dubey Weds Gaurav Jain: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील \फोन करून अभिनेत्री पूनम दुबेला आशीर्वाद देत अभिनंदन केले.

Pramod Yadav

पणजी: भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूनम दुबेने नुकतेच गोव्यात लग्न करून आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे. १८ एप्रिल २०२५ रोजी गोव्यातील प्रसिद्ध ला काबाना रिसॉर्टमध्ये पूनमने गौरव जैन याच्याशी विवाह केला.

गौरव जैन याच्याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. पूनम दुबेच्या लग्नाला भोजपुरी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील जोडप्याला फोन करून आशीर्वाद देत अभिनंदन केले. भोजपुरी सुपरस्टार आणि विद्यमान खासदार - मनोज तिवारी आणि रवी किशन हे देखील नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी गोव्यात दाखल झाले होते.

याशिवाय सुपरस्टार यश मिश्रा, अभिनेत्री शुभी शर्मा, विकास सिंग वीरपण आणि पूनमच्या जवळच्या मित्रांसह अनेक चित्रपट कलाकारांनी लग्नाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या. समोर आलेल्या माहितीनुसार, पूनम आणि गौरव खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते, त्यानंतर १८ एप्रिल रोजी दोघांनी लग्न केले. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पूनम दुबे ही प्रयागराज, उत्तर प्रदेशची रहीवासी आहे. तिने २०१४ मध्ये "जो जीता वही सिकंदर" या भोजपुरी चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात त्याने खेसरीलाल यादवसोबत स्क्रीन शेअर केली होती. पूनम ही भोजपुरी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे आणि तिने हम हैं जोडी नंबर 1, रंगदारी कर, आणि जो जीता वही सिकंदर या सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. या चित्रपटातून तिने आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे.

आपल्या अभिनय, सौंदर्य आणि फिटनेससाठी प्रसिद्ध असलेल्या पूनमने आत्तापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले असून भोजपुरी प्रेक्षकांच्या हृदयात तिने खास स्थान निर्माण केले आहे. लग्नानंतर ती चित्रपटांपासून दुरावणार की पूर्वीसारखीच ॲक्टिव्ह राहणार याच्या चर्चा सध्या समोर येऊ लागल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

SCROLL FOR NEXT