Pope Francis Death: पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन

Pope Francis Passed Away: पोप यांना गेल्या १२ वर्षांच्या काळात विविध आजारांनी ग्रासले होते. नुकतेच त्यांना निमोनिया या गंभीर आजारातून बरे झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होते.
Pope Francis Death
Pope Francis Passed AwayDainik Gomantak
Published on
Updated on

व्हॅटिकन: गेल्या काही दिवसांपासून आजारी असणाऱ्या पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. पोप यांच्या निधनाची अधिकृत माहिती व्हॅटिकनच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. रोमन कॅथोलिक चर्चचे ते पहिले लॅटिन अमेरिकन पोप होते. 2013 मध्ये बेनेडिक्ट XVI यांनी राजीनामा दिल्यानंतर ते पोपपदी विराजमान झाले होते.

पोप यांना गेल्या १२ वर्षांच्या काळात विविध आजारांनी ग्रासले होते. नुकतेच त्यांना निमोनिया या गंभीर आजारातून बरे झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होते.

Pope Francis Death
FDA Raid Ponda: फोंड्यातील मेगा मार्टमध्ये उंदरांचा सुळसुळाट, 'एफडीए'च्या छाप्यात धक्कादायक वास्तव समोर

"प्रिय बंधू आणि भगिनींनो, मला अतिशय दुःखाने आपले पवित्र फादर फ्रान्सिस यांच्या निधनाची घोषणा करत आहोत. आज सकाळी 7:35 वाजता, रोमचे बिशप, फ्रान्सिस, देवा घरी परतले. त्यांचे संपूर्ण जीवन प्रभूच्या आणि त्यांच्या चर्चच्या सेवेसाठी समर्पित होते. त्यांनी आम्हांला धर्माची मूल्ये, विशेषत: गॉस्पेलच्या प्रेमासह जगण्यास शिकवले," असे व्हॅटिकन पोप यांच्या निधनाची घोषणा करताना म्हटले आहे.

Pope Francis Death
Green Lungs Project मुळे निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या गोव्याचा चेहरामोहरा बदलून जाईल पण..! विशेष लेख

पोप फ्रान्सिस यांचा जन्म अर्जेंटिना येथे जॉर्ज मारिओ बर्गोग्लिओ येथे १९३६ मध्ये झाला होता. २०१३ मध्ये पोप बेनेडिक्ट XVI च्या राजीनाम्यानंतर ते इतिहासातील पहिले लॅटिन अमेरिकन पोप झाले. जेसुइट मूल्यांनुसार विनम्र जीवनशैलीसाठी त्यांना ओळखले जाते. पोप होण्यापूर्वी त्यांनी कधीही चर्चकडून पैसे घेतले नाहीत, असे व्हॅटिकनकडून २००१ मध्ये स्पष्ट करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com