Dona Paula Crime: "गुन्हेगारांना धाक उरलेलाच नाही" दोना पावला प्रकरणावरून आलेमाव यांचा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सवाल?

LOP Yuri Alemao: या प्रकारामुळे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर निशाणा साधला आहे
Alemao on goa police
Alemao on goa policeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दोना पावला येथे धेम्पो परिवाराच्या घरात घुसून तिघा दरोडेखोरांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. धेम्पो हे गोव्यातील एक प्रतिष्ठित घराणं आहे, तरीही त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्याला मारहाण करून दोन वृद्धांना बांधून ठेवत घडलेल्या या प्रकारामुळे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर निशाणा साधला आहे. एक्स म्हणजेच ट्विटरवर पोस्ट करत ही घटना अधोरेखित केलीये.

काय म्हणाले आलेमाव?

पणजी शहरातील दोना पावला येथे घडलेल्या दरोड्याच्या प्रसंगावर बोलताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी यांनी पोलिसांवर निशाणा साधला. राज्यात सशस्त्र दरोडेखोरांनी सुरक्षा रक्षक असलेल्या आणि वयोवृद्धांच्या घरांनाही लक्ष्य करणे ही एक धक्कादायक बाब आहे.

अशा प्रकारच्या घटना म्हणजे गुन्हेगारांना आता पोलिसांचा धाक उरलेलाच नाही. गस्त प्रभावी नसल्याने गोव्यात कोणीही सुरक्षित नाही.

Alemao on goa police
Dona Paula Crime: पणजीत चोरट्यांचा धुमाकूळ!! सुरक्षा रक्षकाला मारहाण; वृद्ध दाम्पत्याला बांधून लाखोंचा ऐवज लंपास

गुन्हे घडल्यावरच नाकाबंदी होते, मात्र त्याऐवजी पोलिसांनी गुन्हेगारी रोखण्यावर भर देण्याची गरज आहे.

सध्या गोवा पोलिसांकडून क्राईम ब्रांचचे डीजीपी आलोक कुमार, राहुल गुप्ता आणि डीआयजी वर्षा शर्मा दोना पावला येथील घटना घडलेल्या बंगल्यावर पोहोचलेत. रविवारी (दि.२०) मध्यरात्री या बंगल्यात मध्यरात्रीच्यावेळी खंजीर घेऊन तीन दरोडेखोर घरात घुसले होते. पैकी एकाने वृद्ध धेम्पो जोडप्याला बांधले आणि इतरांनी चोरी करत तिथून पळ काढला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com