Goa Election  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोव्यात अधिकृत प्रचार संपला, आता गुप्त प्रचार सुरू?

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार कालावधी शनिवारी संध्याकाळी 6 वाजता संपला. मात्र, काही उमेदवार गुप्त प्रचार करत असल्याचे चित्र समोर येत आहे. कुचेली-खडपावाडा येथे शनिवारी रात्री भरारी पथकाने पकडलेल्या दुचाकीत 11 हजार रुपये सापडले. पोलिस पुढील चौकशी करत आहेत. म्हापसा येथे देखील पोलिसांनी कारवाई केली आहे. (Goa Election News)

केपे मतदारसंघात शनिवारी रात्री काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. भाजपाचे (BJP) कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांनी केला असून यासंबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, अद्याप पोलिसांकडून याबाबत दुजोरा मिळू शकलेला नाही.

गोव्यात (Goa) प्रचारतोफा शनिवारी थंडावल्या असून सोमवारी मतदान होणार आहे. मात्र, त्यापूर्वी राजकीय वातावरण तापल्याचे दिसते. केपे (Quepem) मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार एल्टन डिकोस्टा यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपाचे उमेदवार चंद्रकांत कवळेकर (Chandrakant Kavalekar) यांचे कार्यकर्ते केपे येथील मतदारांना रात्री उशीरा पैसे वाटत होते, असा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

राज्यात सर्वत्र कलम 144 लागू करण्यात आले आहे. परिणामी, पाच किंवा त्यापेक्षा अधिक जणांना एकत्र येता येत नाही. खासगी वाहने फिरवता येत नाहीत. हे नियम असताना देखील पुढील काही तासात गुप्त प्रचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

शाळकरी मुलांच्या बाबतीत आपण किती जागरूक, शिक्षित आणि गंभीर आहोत?

विजयनगर साम्राज्य, गोव्याचा संदर्भ; मदुराई आणि कुमार कंपण्णांचा इतिहास याबद्दल जाणून घ्या

Top Most Polluted Countries: जगातील 'हे' 8 देश सर्वाधिक प्रदूषित; क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर!

Goa Politics: दिल्लीत नेमके 'काय' घडले? 'कुणाला' समज, 'कुणाला' आदेश..

SCROLL FOR NEXT