महिलांना मासिक 20 हजार मिळतील अशी रोजगारनिर्मिती करणार; सावित्री कवळेकर

स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी त्यांना आमदारकी हवीय; सावित्री कवळेकर
Savitri kavlekar
Savitri kavlekarDainik Gomantak
Published on
Updated on

सांगे : सांगेतील जनतेने आजवर जे प्रेम दिले, ते आपण विसरणार नाही. ही स्वाभिमानी जनता गेल्या पाच वर्षांच्या माझ्‍या कार्याची पोचपावती निश्चितच देईल. अपक्ष आमदार म्हणूनच मी कार्यरत राहणार असून निवडून आल्यावर सांगेत (Sanguem) प्रदूषणविरहित उद्योग आणून बेरोजगारी कमी करण्‍यासाठी प्रयत्‍न करणार आहे.

महिलांच्‍या हातात महिन्‍याला किमान 20 हजार रुपये येतील, अशी रोजगारनिर्मितीची योजना हाती घेणार आहे. त्‍यामुळे प्रत्येकाच्या स्वप्नातील आदर्श सांगे निर्माण करण्यासाठी तुमची सेवक म्हणून कार्य करण्याची संधी द्या, असे कळकळीचे आवाहन या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सावित्री कवळेकर (savitri kavlekar) यांनी येथील जाहीर सभेत केले.

Savitri kavlekar
कोविड बळींच्‍या कुटुंबांना भरपाई देणार; मायकल लोबो

निवडणुकीत (Election) निवडून आल्‍यावर सांगेतील जनतेला 24 तास पिण्याचे पाणी पुरविण्‍याबरोबरच नगरपालिका क्षेत्रातील घरपट्टीचा प्रश्न सोडविण्यावर भर देणार आहे. क्रीडा सुविधा निर्मितीलाही प्राधान्‍य असेल. मोबाईल नेटवर्कची समस्या सहा महिन्यांत सोडविली जाईल. नेत्रावळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याबरोबर सांगे आरोग्य केंद्राचा दर्जा सुधारला जाईल, असे सावित्री म्‍हणाल्‍या.

तुम्ही दोन्ही माजी आमदारांचे कार्य पहिले आहे. स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी त्यांना आमदारकी हवी आहे. खनिजमालाच्या वाहतुकीचे कंत्राट मिळविण्‍यासाठी कसे हे दोन्ही माजी आमदार (MLA) झगडतात हेसुद्धा तुम्ही पाहिले आहे. सांगेकरांसाठी मी पाच वर्ष झटले. निःस्वार्थ काम केले. कोविडच्या काळात मैदानात उतरले. लोकांच्या सुखदुःखात वावरले. ही माझी चूक होती का, असा सवाल करून मी केलेल्‍या कामांची पोचपावती मतदार मला देतील, असा विश्‍‍वास सावित्री यांनी व्‍यक्त केला.

नगरसेवक मेशू डिकॉस्ता म्‍हणाले की, सांगे नगरपालिका (Municipality) क्षेत्रातून सावित्री यांना अडीच हजार मते देण्याचा निश्चय करूया. त्‍यांनी ख्रिचन समाजाला खूप मदतीचा हात दिला असून सांगे चर्चच्या हॉलसाठी तांत्रिक मंजुरी मिळून देण्‍याचे मोलाचे कार्य केले आहे. सावित्री या कोणताही धर्म, जात न पाहता कार्य करीत आहेत. म्‍हणूनच तमाम मतदारांनी त्यांना साथ द्यावी.

नगरसेवक संगमेश्वर नाईक यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्‍या विधानावर टीका करताना त्‍यांनी दिल्लीचे राजकारण पाहावे व नंतरच सांगेतील राजकारणावर बोलावे असा सल्ला दिला. यावेळी चंदन उनंदकर, महेश गावकर, उदय गावकर यांचीही भाषणे झाली. चांगुणा साळगावकर, पांडुरंग तारी, नानू भांडोळकर, हर्षा सांबारी, आनंद नाईक, सदानंद गावडे, मनोज पर्येकर, चंद्रकांत गावकर, संतोष गावकर, शफी सय्यद, संगमेश्वर नाईक, सगुण गावकर, कांता कालेकर, क्‍लेफी आल्‍फोन्‍सो, शेरॉन डिसोझा, प्रणय कावरेकर, पावटो गावकर, जानू झोरे, जानू ताटे, प्रतिभा गावकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत गावकर यांनी केले तर सुदेश भंडारी यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com