Congress, TMC, BJP and AAP Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election: नावेली मतदारसंघात होणार चौरंगी लढत

2012 साली भाजपने पाठिंबा दिलेल्या फुर्तादो यांचा विजय झाला असला तरी, अजूनही स्वबळावर भाजप विजयी झाला नाही.

दैनिक गोमन्तक

पणजी: नावेली मतदारसंघ हा सध्या चर्चेत असून या मतदारसंघात कॉंग्रेसचे आवेर्तान फुर्तादो, 'आप'च्या प्रतिमा कुतिन्हो, तृणमूलच्या वालांका आलेमाव, भाजपचे उल्हास तुयेकर यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. भाजपला तसे इथे विशेष स्थान नाही. 2012 साली भाजपने पाठिंबा दिलेल्या फुर्तादो यांचा विजय झाला असला तरी, अजूनही स्वबळावर भाजप विजयी झाला नाही. त्यामुळे या मतदारसंघात असलेली भाजपची शक्ती प्रतीत होत नाही. कॅथलिक मतांचे विभाजन झाल्यास व हिंदूची एक गठ्ठा मते भाजपच्या पारड्यात पडल्यास भाजप इथे ‘चमत्कार’ घडवू शकतो. (Goa Election News)

फुर्तादो हे 2012 साली अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांनी पर्रीकर सरकारात मंत्रिपदही भूषविले होते. आता नावेलीचे माजी आमदार लुईझिन फालेरो यांनी कॉंग्रेस सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केल्यामुळे फुर्तादो यांनी कॉंग्रेसमध्ये (Congress) ‘एन्ट्री’ घेतली आहे. दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसच्या रणरागिणी म्हणून गणल्या जाणाऱ्या प्रतिमा कुतिन्हो या आता आपची ‘तोफ’ बनल्या आहेत. तर 2012 साली कॉंग्रेसतर्फे निवडणूक लढविलेल्या वालांका या आता तृणमूलतर्फे निवडणूक लढवित आहेत. भाजपने ही उमेदवारी जि.पं. सदस्य उल्हास तुयेकर यांना देऊन निवडणुकीत चुरस आणली आहे. कॅथलिक मतांचे विभाजन होऊन भाजपला संधी मिळेल, असे भाजप नेत्यांना वाटत आहे. बॅन्टी डिसिल्वा (आरजी)मोहम्मद मुजावर (राष्ट्रवादी), आंतोनिया आल्वारिस, दिग्वजिय चव्हाण, फ्रान्सिको कुलासो (तिन्ही अपक्ष) हे उमेदवार रिंगणात आहेत. असे असले तरी प्रामुख्याने लढत होणार आहे, ती या चार उमेदवारांतच.

सध्या भाजप (BJP) कार्यकर्ते एक दिलाने तुयेकर यांचा प्रचार करताना दिसताहेत. यावेळी भाजप जिंकल्यास प्रथमच ते नावेलीत प्रवेश करू शकतील. त्यामुळे कॉंग्रेस, आप व तृणमूल हे समविचारी पक्ष एकामेकांची किती मते घेतात, यावर भाजपचे भवितव्य अवलंबून असणार आहे. यांच्या बरोबर आरजी, राष्ट्रवादी हे पक्ष स्पर्धेत आहेत. मुजावर हे कॉंग्रेसकडून इच्छुक होते. पण उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीशी (NCP) ‘घरोबा’ केला. त्यांची उमेदवारी कॉंग्रेसला धक्का देऊ शकते.

प्रतिमा कुतिन्होंची प्रचारात आघाडी

प्रतिमा कुतिन्हो यांनी सध्या प्रचारात आघाडी घेतली असून आता आवेर्तान फुर्तादो हे ही सक्रिय झाले आहेत. या दोन उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला असल्यामुळे तराजू कोणाकडे झुकेल हे सांगता येणे कठीण आहे. फुर्तादो हे मागे मंत्री असल्यामुळे त्यांचा मतदारांशी चांगलाच संपर्क आहे. पण गतवेळी त्यांचा फालेरोंकडून पराभवही झाला होता. आता लुईझिन रिंगणात नसले तरी ते वालांका यांचा प्रचार करताना दिसत आहेत. लुईझिन तृणमूलमध्ये गेल्यामुळे अनेक मतदार नाराज असून ते आता वालांकाला कसे प्रतिसाद देतात, ते बघावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

समुद्री मार्ग झाला खुला! 7 वर्षांनंतर मुरगाव पोर्टवर सुरू होणार कंटेनर सेवा, निर्यातदारांना मोठा दिलासा

World Record! 11 चेंडूत 8 षटकार... युवा फलंदाजानं ठोकलं सर्वात जलद अर्धशतक, स्फोटक फलंदाजीचा VIDEO पाहाच

Viral Video: 'ओंकार' हत्तीची शेतात अचानक एन्ट्री... म्हशींनी जीव वाचवण्यासाठी ठोकली धूम, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Gujarat ATS Foils Terror Plot: मोठा दहशतवादी कट उधळला! गुजरात एटीएसने अहमदाबादमध्ये शस्त्रसाठ्यासह तिघांना ठोकल्या बेड्या; दहशतवादी नेटवर्क हादरले VIDEO

मासेविक्री बाजाराची दुरवस्था कायम, माशांच्या तुटवड्याने दर गगनाला भिडले; विक्रेत्यांचा SGPDA वर संताप

SCROLL FOR NEXT