'मनोहर पर्रीकरांचे सोनेरी गोव्याचे स्वप्न साकार करा'

असे आवाहन मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी वास्को येथील सभेत केले.
Shivraj Singh Chouhan
Shivraj Singh ChouhanDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: मनोहर पर्रीकर यांचे सोनेरी गोव्याचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी भाजपच्या प्रत्येक नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांची देखील आहे. गोव्याचा समुद्र म्हणजे येथील जनतेचा देव तर देशाचे भाग्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. गोव्याच्या (Goa) विकासाला पुढे नेण्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत द्यावे, असे मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी वास्को येथे सांगितले. (Goa Election 2022 News)

Shivraj Singh Chouhan
Goa Election: विविध पक्षांचे 150 हून अधिक 'स्टार प्रचारक' येणार गोव्यात

दाबोळी मतदारसंघातील नवेवाडे येथील श्री राष्ट्रोळी जय संतोषी माता सभागृहात आयोजित भाजपच्या (BJP) जाहीर सभेत चौहान बोलत होते. व्यासपीठावर त्यांच्यासोबत माविन गुदिन्हो, दाबोळी भाजप प्रभारी जयंत जाधव, नगरसेवक विनोद किनळेकर, दाबोळी भाजप गटाध्यक्ष संदीप सूद, दक्षिण गोवा भाजप अध्यक्ष तुळशीदास नाईक, चंद्रकांत गवस, वामन चोडणकर, दिगंबर आमोणकर व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Shivraj Singh Chouhan
मतविभागणीसाठीच केजरीवाल वारंवार गोव्यात?

ते पुढे म्हणाले, काँग्रेस पक्ष बुडणारे जहाज असून त्यांची सत्ता आता संपली आहे. काँग्रेस (Congress) पक्षाने गोव्याला विकासापासून वंचित ठेवले होते. पंतप्रधान मोदी, केंद्रीय रस्ता अवजड मंत्री गडकरी यांनी गोव्याला नवी दिशा देऊन देशात विकासशील राज्य केले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी येथील प्रत्येकाला कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध केली.

भाजप लोकशाहीचा सन्मान करणारा पक्ष असून गोव्यात भाजपला स्पष्ट बहुमत प्राप्त करणार आहे. दाबोळी विकासात येथील जनतेचे महत्त्वाचे स्थान असून येणाऱ्या काळात दाबोळीचा आणखीन विकास साधणार असल्याची माहिती गुदिन्हो यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com