हेंझील यांची निवडणुकीतील सहकारी मारीशा बनणार त्यांची सहचारिणी!

 

Dainik Gomantak

गोवा निवडणूक

गोवा निवडणुकीचा प्रचार करूया ‘खुल्लमखुल्ला’

अमेरिकेसारख्या देशातही राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार धर्मपत्नीला घेऊन फिरत असतात. कारण तेथे ते कुटुंबवत्सल समाजात प्रतिष्ठेचे मानले जाते. त्याच धर्तीवर आता गोव्यातील दोन उमेदवारांनीही प्रेयसीला घेऊन प्रचार केला आहे.

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : आम आदमी पक्षाचे (AAP) बाणावलीचे युवा जिल्हा पंचायत सदस्य हेंझील फर्नांडिस यांच्या एका वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत (Goa Election) त्यांच्याबरोबर सावलीसारखी उभी असलेली त्यांची सहकारी आणि मैत्रीण मारीशा रॉड्रिग्ज ही आता लवकरच त्यांची सहचारिणी बनणार आहे. 2019 साली झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत हेंझील हे निवडून येणारे आपचे एकमेव उमेदवार होते. गोव्यात लोकप्रतिनिधी बनण्याचे आपचे खाते या युवा अभियंत्याने खोलले होते. मात्र, त्यांच्या राजकीय (Goa politics) प्रवासात त्यांची सहकारी म्हणून खंबीरपणे उभी होती ती त्यांची सहकारी मारीशा.

आता जानेवारी महिन्यात हेंझील आणि मारीशा लग्नगाठ बांधणार आहेत. निवडणुकीत मारीशाने केलेल्या कामाबद्दल सांगताना हेंझील म्हणाले, जिल्हा पंचायत निवडणुकीच्या संपूर्ण केम्पेनमध्ये तिने भाग घेतला होता. माझ्या प्रत्येक बैठकीला ती हजर असायची. प्रचारातही ती माझ्याबरोबर भाग घ्यायची. या निवडणुकीत माझ्यासाठी तसेच माझ्या कुटुंबियांसाठी ती एक खंबीर असा भावनिक आणि मानसिक आधार बनली होती.

आपल्या आणि मारीशाच्या मैत्रीबद्दल माहिती देताना हेंझील म्हणाले, तशी ती मागच्या चार वर्षांपासून मैत्रीण आहे. आम्ही दोघेही वृक्षप्रेमी. वेगवेगळ्या तरेची रोपटी मला आणि तिला आवडतात. अशी रोपटी पाहण्यासाठी जात असतानाच आमची मैत्री झाली. माझ्या निवडणुकीपूर्वीच मी आणि ती मित्र मैत्रीण बनलो होतो. आता पुढच्या महिन्यात ती माझी सहचारिणी बनणार. जानेवारी महिन्यात आम्ही लग्न करत आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cyber Crime: मोठा परतावा देण्याचं आमिष दाखवून 1.52 कोटींचा गंडा, सायबर फसवणूक प्रकरणी मुंबईतून एकाला अटक; गोवा पोलिसांची कारवाई!

IND vs WI 2nd Test: 38 वर्षांपासून एकही पराभव नाही, 'दिल्ली'चं मैदान टीम इंडियासाठी लकी; जाणून घ्या काय सांगते आकडेवारी?

Goa Crime: ग्रील कापून घरात घुसले, दाम्पत्याला बांधून ठेवलं, 50 लाखांचा ऐवज केला लंपास; म्हापशात बुरखाधारी दरोडेखोरांची दहशत

Nobel Prize Physics 2025: भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर! क्वांटम मेकॅनिकल टनलिंगच्या शोधासाठी तीन शास्त्रज्ञांचा गौरव

Horoscope: उद्याचा दिवस खास! 8 ऑक्टोबर रोजी शुभ धन योगामुळे 5 राशींचे भाग्य उजळणार, गणेशाचा असेल विशेष आशीर्वाद

SCROLL FOR NEXT