Devendra Fadnavis, Rajesh Patnekar and Goa Cm Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

फडणवीसांनी तीनवेळा नारळ आपटल्यानंतर पाटणेकर गोवा निवडणुकीच्या रिंगणात

इर्शेने पेटलेले पक्ष गोवा निवडणुकीत उतरले; फडणवीसांचा विरोधी पक्षांवर घणाघात

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या गोवा निवडणुकीची धुरा सांभाळण्यात व्यस्त आहे. आज (शुक्रवारी) पणजी येथील भाजप पक्ष कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांच्या सोबत पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्याय आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधवही उपस्थित होते. भाजप पक्षात प्रवेश, नाराज नेत्यांची मनधरणी ते तिकीट वाटप या सर्व महत्त्वाच्या भूमिका देवेंद्र फडणवीस गोव्यात बजावत आहेत. हे सगळं झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी योग्यरीत्या आपल्या पक्षाचा प्रचार गोव्यात सुरू केला आहे. यावेळी प्रचाराचा शुभारंभ करतांना त्यांनी नारळ दोन ते तीन आपटल्या त्यानंतर तो फुटला यावरून त्यांनी एक मिश्किल स्पष्टिकरण दिले आहे.

"मला तो नारळ दोन-तीन वेळा आपटावा लागला त्यानंतर तो फुटला आता कोणी त्यांच्यासमोर टिकणार नाही हे स्पष्ट झाले आहे. गोव्यात एकीकडे मुख्यमंत्री दुसऱ्या बाजूला मंत्री एका तालुक्यात मुख्यमंत्री काय काय करणार आहे काही लक्षात येत नाही. पण हे सगळ पक्षाच्या हिताचं आहे," असे म्हणत फडणवीसांनी सभेमध्ये अप्रत्यक्षरित्या गोव्याच्या पहिल्या मंत्र्याचे नाव घोषीत केले.

देवेंद्र फडणवीस यांनी राजेश पाटणेकरांचा प्रचार सुरू केला यावेळी त्यांना नारळ तीन वेळा आपटावा लागला असे ते म्हणाले. यामागचे कारण सांगताना फडणवीस यांनी आपल्याला उमेदवाराला तयार करायला थोडा वेळ लागला त्यामुळे मला तीन वेळा तो नारळ आपटावा लागला, असे म्हणून त्यांनी अप्रत्यक्षपणे पाटणेकरांनाच टोला लगावल्याचे दिसून आले. तसेच यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे बघत फडणवीसांनी एकाच तालुक्यात मुख्यमंत्री आणि मंत्री आहेत त्यामुळे नेमके आता काय काय करणार आहेत असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे मंत्रीपदासाठी पाटणेकरांचे नाव घोषीत केले आहे.

तर एकीकडे राजेश पाटणेकर मैदानात उतरले आहेत आता कोणी त्यांच्यासमोर टिकणार नाही आता पाटणेकरच निवडून येणार. गोव्यातील सर्वसामान्यांशी जुडलेला down-to-earth अशा प्रकारचा नेता म्हणून पाटणेकरांची प्रतिमा आहे. आणि त्यांच्याकडे एक प्रदीर्घ अनुभव आहे, असे म्हणत त्यांनी पाटणेकरांचे कौतुकही केले आहे. "खऱ्या आता अर्थाने या निवडणुकीला वेग आलाय. मुख्यमंत्र्यांनी फॉर्म भरला आहे राजेश भाईंनी फॉर्म भरला भारतीय जनता पार्टी अत्यंत भक्कमपणे उभी आहे आणि आता पुढचे काही दिवस सगळ्यांना पूर्ण ताकदिने काम करण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले.

यावेळी त्यांनी गोव्यातील विरोधी पक्षनत्यांवरही निशाा साधला. "गोव्याच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या समोर अनेक पक्ष आहेत. भारतीय जनता पक्षाचे ध्येय एक उत्तम गोवा तयार व्हावा, सामान्य माणसाच्या जीवनात विकास व्हावा, सामान्य माणसाला सोयीसुविधा मिळाव्यात, गरिबाचं मध्यमवर्गीय लोकांचं कल्याण व्हाव, प्रोग्रेसिव गोवा तयार व्हावा याकरता भारतीय जनता पार्टी संघर्ष करत आहे,"असे फडणवीस म्हणाले. मात्र विरोधी पक्षांचं ध्येय काय आहे या प्रश्नांच उत्तर देतांना त्यांनी विरोधी पक्षावर कडाडून टिका केली. "या सगळ्यांच एकच आहे भारतीय जनता पक्षाला पराभूत करणे. त्यांच्या डोक्यात काहीच नाही रात्री बारा वाजता तुम्ही झोपेतून उठवलं तरी बीजेपी ला हरवायचा एवढेच ते बोलतील, इर्शेने पेटलेले पक्ष गोवा निवडणुकीत उतरले आहे, असे उत्तर फडणवीसांनी दिले.

"लोकशाहीमध्ये कुणाला जिंकणं किंवा कोणाला हरवणं हा प्रक्रियेचा भाग आहे पण ते अंतिम ध्येय असू शकत नाही. लोकशाहीने सामान्य माणसाचा विकास करणे हेच लोकशाहीचे अंतिम ध्येय आहे पण या कुठल्याही पक्षाला सामान्य माणसाचा विकास करायचा नाही या पक्षांना कसंही करून भाजपला याकरता पराजित करायचं आहे की, जेणेकरून ते सत्तेवर आल्यानंतर गोव्याच्या सत्तेचे लचके तोडू शकतील," असे म्हणत फडणविसांनी विरोधी पक्षांना जबरदस्त फटकारले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2026: क्रिकेट वर्ल्ड कप शेड्यूल जाहीर, भारत-पाकिस्तान सामन्याबाबत आयसीसीनं घेतला मोठा निर्णय; चाहत्यांची वाढवली उत्सुकता

पंतप्रधानांचे चरणस्पर्श करताच कॅमेऱ्यांनी टिपला क्षण! ऐश्वर्याने घेतले मोदींचे आशीर्वाद; श्री सत्य साईबाबांच्या जन्मशताब्दी सोहळ्यातील Video Viral

PM Kisan 21st Installment: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता पंतप्रधान मोदींनी केला जारी

Pooja Naik: "ढवळीकर कुटुंबाविरुद्ध जे कारस्थान करतायत, त्यांना...", समर्थकांचे कोटादेवचार देवस्थानात 'गाऱ्हाणे'

IFFI Goa 2025: "इफ्फीपर्यंत पोहोचावं कसं?" हे आहेत उत्तर-दक्षिण गोवा ते पणजीचे काही सोपे मार्ग; जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT