Goa Election 2022 Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोव्यात पक्षांतराची भीती! उमेदवारांना घेवून कॉंग्रेसने गाठले मंदिर, मशिदी अन् चर्च

गोव्याच्या राजकारणाचा इतिहास पाहता निकालापेक्षा गोव्यातील विजयानंतर काय होणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Assembly Elections 2022: गोव्यात विधानसभा निवडणुकीबाबत (Goa Election 2022) गदारोळ सुरू आहे. विधानसभा जागांच्या बाबतीत देशातील इतर राज्यांच्या तुलनेत गोवा अगदीच लहान असला तरी येथील पक्षांतराचे राजकारण बड्या नेत्यांना त्यांचे राजकारण नव्याने शिकवण्याची ताकद ठेवत आहे. गोव्यात विजयापेक्षा नेत्यांच्या पक्षांतराचा प्रश्न सध्या खूप मोठा आहे, म्हणून गोव्यात काँग्रेस (Congress) मंदिर, मशिदी, चर्चच्या फेऱ्या मारत आहे.

2017 सारखी परिस्थिती गोव्यात पुन्हा उद्भवू नये यासाठी काँग्रेस निवडणुकीपूर्वी पूर्ण तयारी करत आहे. काँग्रेसचे गोवा प्रभारी पी. चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, कारण गोव्यातील पक्षांतराचे राजकारण बघून तेही नाकीनऊ आले आहेत. 2017 मध्ये काँग्रेसच्या अनेक आमदारांनी पक्षांतर केले होते. त्यामुळे कॉंग्रेस गोव्यात सत्ता स्थापन करू शकली नाही. आता विधानसभेत सध्या काँग्रेसचे केवळ दोन सदस्य आहेत.

पक्षांतरविरोधी राजकारणावर एडीआरने केला खुलासा

एडीआरच्या अहवालानुसार, 2017 ते 2022 या पाच वर्षांत गोव्यातील सुमारे 60 टक्के आमदारांनी पक्षांतरण केले आहे. विजयानंतर सुमारे 24 आमदारांनी बाजू बदलली. हा आकडा भारतीय लोकशाहीसाठी धक्कादायक आहे. 2017 पासून काँग्रेसच्या 17 पैकी 15 आमदारांनी पक्ष बदलला आहे. 2019 मध्ये यातील 10 आमदारांनी कॉंग्रेसचा हात सोडून कमळ हाती धरले.

दरम्यान, गोव्यात भाजपलाही मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत भाजपचे नेते असलेले गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर तिकीट न मिळाल्याने बंडखोरीवर उतरले आहेत. त्यांनी मांद्रे विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आणि विद्यमान आमदार आणि भाजपचे उमेदवार दयानंद सोपटे यांच्याविरोधात मोर्चा उठवला.

उत्पल पर्रीकर यांनीही गदारोळ केला

मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांच्या पणजी मतदार संघातील तिकीटावरून गोव्यात चांगलाच गदारोळ सुरू आहे. उत्पल हे भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र आहेत. मात्र ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. सर्वच पक्षांनी आधी तिकिटासाठी त्याना ऑफर दिली होती. मात्र आता त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेवून भाजपची डोकेदुखी वाढवली आहे.

गोव्यातील विधानसभेच्या 40 जागांसाठी 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. 10 मार्चला निकाल लागणार आहे. मात्र गोव्याच्या राजकारणाचा इतिहास पाहता निकालापेक्षा गोव्यातील विजयानंतर काय होणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT