'इतर पक्षांच्या सरचिटणीसांशी वाद घालायचा नाही' पी चिदंबरम यांचा पलटवार

गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Election 2022) भारतीय जनता पक्षाने विजय मिळवल्यास चिदंबरम यांनी जाहीरपणे जबाबदारी स्विकारावी
P. Chidambaram
P. ChidambaramDainik Gomantak
Published on
Updated on

काँग्रेस नेते पी चिदंबरम (P. Chidambaram) यांनी शनिवारी तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या युती विषयावर टिपणी करण्यास नकार दिला. "मला इतर पक्षांच्या सरचिटणीसांशी वाद घालायचा नाही. मी काँग्रेसचा अत्यंत नम्र कार्यकर्ता आहे," असे काल पी चिदंबरम म्हणाले. अभिषेक बॅनर्जी यांनी गुरुवारी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांवर लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप केल्यानंतर चिदंबरम यांनी हे विधान केले. गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Election 2022) भारतीय जनता पक्षाने विजय मिळवल्यास चिदंबरम यांनी जाहीरपणे जबाबदारी स्विकारावी असेही बॅनर्जी यांनी (Abhishek Banerjee) म्हटले आहे.

टीएमसी (TMC) गेल्या अनेक महिन्यांपासून काँग्रेस (Congress) पक्षाशी युती करण्याचा प्रयत्न करत आहे, विशेषत: पश्चिम बंगालच्या बाहेर आपली मुळे मजबूत करण्यासाठी गोवा विधानसभा निवडणुकीत टीएमसी प्रथमच आपले नशीब आजमावत आहे आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइझिन फालेरो आणि टेनिस स्टार लिएंडर पेस यांच्यासह अनेक प्रमुख नेते पक्षात सामील झाले आहे.

गुरुवारी पत्रकार परिषदेत अभिषेक बॅनर्जी यांनी काँग्रेस नेते पी चिदंबरम यांच्यावर टिकेचे ताशेरे ओढले. काँग्रेसच्या दिग्गज व्यक्तींबद्दल अधिक आदर असूनही, ते स्वतःच्या स्वार्थासाठी ज्या प्रकारे लोकांची दिशाभूल करत आहेत ते उघड केले पाहिजे आणि सार्वजनिक क्षेत्रात आणले पाहिजे, असे वक्तव्य बॅनर्जी यांनी केले होते.

P. Chidambaram
Goa Election 2022: 'गोव्याच्या भविष्यासाठी भाजपला घरी पाठवा'

भाजपपासून मुक्ती मिळवण्यासाठी टीएमसी गोव्यात

"तृणमूल काँग्रेसने काँग्रेस पक्षाला गोव्यात युतीची ऑफर देत नसल्याबद्दल सत्य पी चिदंबरम लपवत आहेत. तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पवन वर्मा डिसेंबरमध्ये दुपारी 1.30 वाजता चिदंबरम यांच्या घरी गेले होते, असा आरोप अभिषेक बॅनर्जी यांनी केला. तृणमूल किनारी राज्य भाजपपासून (BJP) मुक्त करण्यासाठी गोव्यात आले आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील हा एकमेव असा पक्ष आहे जो भाजपपुढे झुकला नाही, असे ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी सांगितले.

शुक्रवारी पवन वर्मा यांनीही चिदंबरम यांची खिल्ली उडवली. ते म्हणाले की, " 24 डिसेंबर रोजी काँग्रेस नेत्याच्या घरी TMC सोबत युतीचा प्रस्ताव घेऊन गेलो होतो, ज्याचे उद्दिष्ट राज्यातील फुटीर भाजपला बाहेर काढायचे होते एक ठोस योजना घेऊन मी तासभर त्याच्यासोबत बसलो, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आणि शेवटी आगामी गोवा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी (एमजीपी) हातमिळवणी केली आहे."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com