Fumio Kishida Dainik Gomantak
ग्लोबल

Fumio Kishida: कुणी वाचवला जपानी पंतप्रधांनाचा जीव, हल्लेखोर गजाआड!

Fumio Kishida News: जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे शनिवारी सकाळी पश्चिम जपानमधील एका बंदरावर झालेल्या स्फोटातून थोडक्यात बचावले.

Manish Jadhav

Fumio Kishida News: जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे शनिवारी सकाळी पश्चिम जपानमधील एका बंदरावर झालेल्या स्फोटातून थोडक्यात बचावले. त्या ठिकाणी उपस्थित मच्छिमारांनी पंतप्रधानांचे प्राण वाचवले, ज्यांचे आता खूप कौतुक होत आहे.

वास्तविक, घटनास्थळी उपस्थित असलेल्या त्सुतोमू कोनिशीने आपल्या डोक्यावरुन एक 'संशयास्पद वस्तू’ गेल्याचे आणि पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) यांच्याजवळ पडल्याचे पाहताच त्यांनी आणि इतर काही मच्छिमारांनी तत्परता दाखवून एका व्यक्तीला पकडले. पोलिसांनी नंतर या व्यक्तीला हल्ल्यातील संशयित म्हणून ओळखले.

एकीकडे, सुरक्षा अधिकाऱ्याने बुलेटप्रूफ ब्रीफकेसने वस्तू झाकली आणि दुसरीकडे मच्छिमारांपैकी एकाने त्या व्यक्तीची मान मागून धरली, दुसऱ्याने त्याचे डोके खाली दाबले आणि कोनिशी यांनी त्याचा पाय धरला. त्यातच काही क्षणांनंतर, एक स्फोट झाला. घटनास्थळावरील लोक सैरावैरा धावले.

पंतप्रधानांचे भाषण सुरु होण्यापूर्वीच हा स्फोट झाला

स्थानिक निवडणुकीत आपल्या सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी किशिदा काल वाकायामाच्या साईकजाकी येथे पोहोचले होते. पंतप्रधान आपले भाषण सुरु करणारच तेवढ्यात स्फोट झाला.

मुख्य कॅबिनेट सचिव हिरोकाझू मात्सुनो यांनी सांगितले की, संशयित समजल्या जाणाऱ्या तरुणाला शनिवारी घटनास्थळावरुन अटक करण्यात आली. त्याने ‘संशयास्पद वस्तू’ फेकल्याचा आरोप आहे. त्यानंतर स्फोटही झाला.

नऊ महिन्यांपूर्वी माजी पंतप्रधानांची हत्या झाली होती

या घटनेने नऊ महिन्यांपूर्वी पश्चिमेकडील नारा शहरात निवडणूक (Election) प्रचारादरम्यान किशिदांचे पूर्ववर्ती शिंजो आबे यांच्या हत्येच्या आठवणींना उजाळा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

Budh Gochar 2026: हस्त नक्षत्रात बुधाचे महागोचर! 5 राशींच्या जातकांची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहणार; व्यवसायात येणार मोठी तेजी

Education System Crisis: सत्य निकेतनची इमारतच नाही, तर शिक्षण व्यवस्थाही ढासळतेय! विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपासून शिक्षणाच्या बजेटपर्यंत गंभीर प्रश्न

Karapur Mega Project: 161 दिवसांनंतर कारापूरवासीयांचे आंदोलन अखेर मागे! 'वन गोवा' प्रकल्पाला काम बंद करण्याची पंचायतीची नोटीस; न्यायालयीन लढा मात्र सुरूच

Goa Forward AAP Alliance: 'गोवा फर्स्ट' आघाडीची तयारी अंतिम टप्प्यात! विजय सरदेसाईंना सर्वाधिकार; 'आप'सह समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT