Fumio Kishida: '...जपान नाहीसा होईल', पंतप्रधानांच्या या वक्तव्यावरुन निर्माण झाला वाद?

Japan Population Crisis: जपानमध्ये जन्मदरात होत असलेली ऐतिहासिक घसरण हे चिंतेचे कारण बनले आहे. जपानी लोकांना मुले होऊ द्यायची नाहीत. जपानमध्ये ही समस्या खूप गंभीर आहे.
Fumio Kishida
Fumio KishidaDainik Gomantak
Published on
Updated on

Japan Will Disappear One Day Said Fumio Kishida: जपानचे नाव ऐकल्यावर तुमच्या डोळ्यांसमोर लगेच काय येते?... जपानी लोकांची ओळख शिस्तप्रीय, मेहनती अशी आहे. जपान अनेक दशकांपासून तंत्रज्ञानाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे.

मात्र, आता जपानची ओळख वृद्धांचा देश म्हणून होऊ लागली आहे. जपानमध्ये जन्मदरात होत असलेली ऐतिहासिक घसरण हे चिंतेचे कारण बनले आहे. कारण जपानी लोकांना मुले होऊ द्यायची नाहीत. जपानमध्ये ही समस्या खूप गंभीर आहे.

जपानच्या घटत्या लोकसंख्येची चिंता का?

-2022 मध्ये जपानमध्ये (Japan) 7,99,728 लाख मुलांचा जन्म झाला.

-125 वर्षात पहिल्यांदाच एका वर्षात इतक्या कमी मुलांचा जन्म झाला.

तर 2022 मध्ये 15 लाख 80 हजार लोकांचा मृत्यू झाला.

- 1 जानेवारी 2023 रोजी जपानची लोकसंख्या 124.7 दशलक्ष होती, जी 1 जानेवारी 2022 च्या लोकसंख्येपेक्षा 043% कमी आहे.

- 2065 पर्यंत, जपानची लोकसंख्या 88 दशलक्ष पर्यंत कमी होईल, म्हणजे सध्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत 30% कमी होईल.

Fumio Kishida
जपान लष्कराचे Black Hawk Helicopter बेपत्ता, 10 क्रू मेंबर्स अडकले; पीएम किशिदा म्हणाले...

दुसरीकडे, जपानच्या लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोकसंख्या 62 वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे, जी 2050 पर्यंत एक तृतीयांश वाढण्याची शक्यता आहे.

येत्या काळात जपानसाठी लोकसंख्येचे संकट किती मोठी समस्या असेल, हे यावरुन समजू शकते की, जपानची लोकसंख्या 65 वर्षांपेक्षा जास्त वयाची 29% आहे. त्याचवेळी, शून्य ते 14 वर्षे वयोगटातील मुलांची लोकसंख्या (Population) केवळ 116% आहे.

जपानी लोकांच्या मनात काय चालले आहे?

गेल्या अनेक वर्षात इथे लिव्ह-इन रिलेशनशिपचा ट्रेंड खूप वेगाने वाढला आहे. लिव्ह-इनमध्ये राहणारे तरुण आपले जीवन आनंदाने जगत आहेत, परंतु त्यांना पालक बनण्याची इच्छा नाही. इथे लोक मुलांना 'त्रास' समजू लागले आहेत.

जपानमधील तरुण मुली लग्न करुन मुले होण्यास टाळाटाळ करत आहेत. जपानमध्ये, 2020 मध्ये, 25 ते 29 वयोगटातील 66% मुलींनी लग्न केले नाही तर 30 ते 34 वयोगटातील 39% मुलींनी विवाह टाळला. हा आकडा जपानसाठी भयावह आहे.

Fumio Kishida
भारत-जपान संबंध सुधारण्यासाठी कटिबद्ध: पंतप्रधान नरेंद्र मोदी

'अशीच परिस्थिती राहिली तर जपान एक दिवस नाहीसा होईल'

जपान सरकार जन्मदर वाढवण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवत आहे. विवाहित जोडप्यांना मुले होण्यासाठी प्रोत्साहन देणे. सरकारने बाल संगोपन संस्थांच्या सेवांचा विस्तार केला आहे. कार्य-जीवन समतोल निर्माण करण्यासाठी योजना तयार केल्या आहेत. पण, त्याचा काही विशेष परिणाम झालेला दिसत नाही.

नुकतेच जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांना असेच म्हणायचे होते की, ही स्थिती अशीच राहिली तर जपान एक दिवस नाहीसा होईल. हे वक्तव्य आल्यानंतर जपानच्या सोशल मीडियावर पंतप्रधानांच्या वक्तव्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करून मोठी चर्चा सुरु झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com