Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Political Crisis: इम्रान खानचा खेळ होणार खल्लास! फाशी की जन्मठेप; पाकिस्तानचा लष्करी कायदा...

Pakistan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी देशभरात निदर्शने, हिंसाचार सुरु केला.

Manish Jadhav

Pakistan Political Crisis: पाकिस्तान सध्या राजकीय संकटाबरोबर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी देशभरात निदर्शने, हिंसाचार सुरु केला.

यातच, आता इम्रान खान यांना झुल्फिकार अली भुट्टोप्रमाणे फाशी होणार का? की त्यांना आयुष्यभर तुरुंगात राहावे लागणार? पाकिस्तानमध्ये लष्कराने ज्या पद्धतीने तयारी केली आहे, ते पाहता प्रत्येकाच्या मनात हे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.

ज्याची मदत घेत भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना सापळ्यात अडकवून वर्षानुवर्षे तुरुंगात डांबले गेले आहे, त्याच कायद्याखाली इम्रान यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरु झाली आहे.

दरम्यान, इम्रान यांच्या अटकेनंतर लष्कर आता कोणालाही सोडण्याच्या मनस्थितीत नाही. इम्रान यांना संपवण्यासाठी पाकिस्तानी लष्कर त्यांच्यावर लष्करी कायदा आणि ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्टतर्गंत खटला चालवण्याची तयारी करत आहे.

म्हणजेच यात दोषी आढळल्यास फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा निश्चित आहे. नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत दोषींवर पाकिस्तानच्या आर्मी अॅक्ट आणि ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्टनुसार कारवाई करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.

पाक सर्वोच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने इम्रान यांच्या बाजूने निकाल दिला, त्यानंतर लष्कर आणि सरकारने मिळून एक नवा डाव रचला आहे.

इम्रान यांची रावळपिंडीत चौकशी करण्यात आली

इम्रान खान (Imran Khan) यांना अटक केल्यानंतर NAB कार्यालयात नेण्यात आले होते. NAB कार्यालय रावळपिंडी येथे आहे. या कार्यालयात त्यांची चौकशी करण्यात आली.

मात्र, या बेकायदेशीर अटकेला पक्षाच्या नेतृत्वाने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आव्हान दिल्याने पीटीआय प्रमुख इम्रान खान यांना दिलासा मिळाला.

एनएबीचे म्हणणे आहे की, इम्रान खान, पत्नी बुशरा बीबी आणि इतरांवर अल कादिर युनिव्हर्सिटी ट्रस्टच्या नावावर शेकडो कनाल जमीन घेतल्याचा आरोप आहे, ज्याची चौकशी केली जात आहे. या प्रकरणात राष्ट्रीय तिजोरीचे मोठे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

SCROLL FOR NEXT