Pakistan Political Crisis: 'मला पुढील 10 वर्षे तुरुंगात ठेवण्याची योजना...', इम्रान खान यांचा लष्करावर गंभीर आरोप

Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी सोमवारी दावा केला की, 'देशाच्या शक्तिशाली लष्कराने देशद्रोहाच्या आरोपाखाली मला पुढील 10 वर्षे तुरुंगात ठेवण्याची योजना आखली आहे.'
Imran Khan
Imran KhanDainik Gomantak

Pakistan Political Crisis: पाकिस्तानमधील राजकीय संकट अधिक गडद होत चाललं आहे. यातच, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी सोमवारी दावा केला की, 'देशाच्या शक्तिशाली लष्कराने देशद्रोहाच्या आरोपाखाली मला पुढील 10 वर्षे तुरुंगात ठेवण्याची योजना आखली आहे.' त्यांनी सोमवारी ट्विट केले.

ज्यामध्ये इम्रान यांनी लिहिले की, 'आता लंडनची संपूर्ण योजना समोर आली आहे. मी तुरुंगात असताना त्यांनी हिंसाचाराचा बहाणा करुन न्यायाधीश आणि जल्लादची भूमिका बजावली. आता बुशरा बेगमला तुरुंगात टाकून माझा डाव संपवण्याची त्यांची योजना आहे.

मला पुढील दहा वर्षे तुरुंगात ठेवण्यासाठी देशद्रोहाच्या कायद्याचा वापर केला जात आहे.' इम्रान यांनी त्यांच्या लाहोर येथील निवासस्थानी पीटीआय नेत्यांच्या बैठकीनंतर हे ट्विट केले आहे.

लोकांना गुंडगिरी केली जात आहे

70 वर्षीय इम्रान खान (Imran Khan) सध्या 100 हून अधिक प्रकरणांमध्ये जामिनावर बाहेर आहेत. इम्रान म्हणाले की, 'लष्कराने दोन डावपेचांचा अवलंब केला आहे.

प्रथम, केवळ पीटीआय कार्यकर्त्यांवरच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांमध्ये मुद्दाम दहशत पसरवली. दुसरे म्हणजे, मीडिया पूर्णपणे नियंत्रित आणि दडपलेला आहे.

घरे पाडली जात असून घरातील महिलांना पोलिस निर्लज्जपणे मारहाण करत आहेत. लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी हे जाणूनबुजून केले जात आहे.

मला अटक करायला पोलिस आले तर लोक बाहेर पडू नये म्हणून हे केले जात आहे. त्यानंतर ते इंटरनेट बंद करतील आणि सोशल मीडियावरही बंदी घालतील.'

Imran Khan
Pakistan Political Crisis: 'तुम्ही आता इम्रानच्या पक्षात सामील व्हा...', मरियम शरीफ यांचा सरन्यायाधींशावर हल्लाबोल

मी शेवटपर्यंत पाकिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार

पाकिस्तानच्या जनतेला आपला संदेश देताना खान म्हणाले की, 'मी शेवटपर्यंत पाकिस्तानच्या (Pakistan) स्वातंत्र्यासाठी लढणार आहे. कारण या बदमाशांचे गुलाम होण्यापेक्षा मरण पत्करलेले कधीही चांगले.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com