Sehwag viral statement Dainik Gomantak
ग्लोबल

Ceasefire Violation: "कुत्ते की दुम...." शस्त्रसंधीचे उल्लंघन केलेल्या पाकिस्तानवर वीरेन्द्र सेहवागचा हल्लाबोल

Virendra Sehwag Virat Tweet: भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेन्द्र सहवाग यांने सोशल मिडियावर पाकिस्तानच्या या कृतीचा निषेध व्यक्त केलाय

Akshata Chhatre

Virendra Sehwag Virat Tweet on Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणाव अजूनही शांत होण्याचं नाव घेत नाहीये. शनिवार(दि.१०) रोजी दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करण्यावर एकमत झाल्याने युद्ध थांबल्याच्या बातम्या समोर येत होत्या, मात्र केवळ तीन तासांत पाकिस्तानकडून या शस्त्रसंधी कारारचे उल्लंघन झाल्याने पुन्हा एकदा संताप उफाळून आलाय. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेन्द्र सहवाग यांने सोशल मिडियावर पाकिस्तानच्या या कृतीचा निषेध व्यक्त केलाय.

शस्त्रसंधीचे उल्लंघन केलेल्या पाकिस्तानवर राग व्यक्त करत वीरेन्द्र सेहवाग याने पाकिस्तानला उद्देशून "कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच" या म्हणीचा वापर केलाय. सध्या सेहवागने केलेलं हे रोखठोक विधान त्याच्या भारतीय चाहत्यांनी उचलून धरलंय.

"कुत्ते की दुम.." असं म्हणत त्याने पाकिस्तान त्याच्या कुरापती कधीही सोडणार नाही असंच म्हटलंय. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीचं बोलणं झाल्यानंतर पाकिस्तान किमान या कराराचं पालन करेल अशी अपेक्षा बाळगली जात होती.

मात्र केवळ तीन तासांत पाकिस्तानने सीमेवर पुन्हा हल्ला चढवल्याने पाकिस्तान सारख्या राष्ट्राकडून अपेक्षा बाळगली जाऊच शकत नाही हे स्पष्ट झालं आहे.

भारतीय सैन्याला पुन्हा एकदा पाकिस्तानचा इरादा हाणून पाडण्यात सैन्याला यश मिळालं आहे. पाकिस्तानने शनिवारी रात्री जम्मूसह राजस्थान आणि पंजाब या ठिकाणी देखील हल्ला केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या, मात्र भारतीय सैन्याने पूर्ण संयमाने हा हल्ला देखील परतवून लावला आहे. शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यानंतर आता पुन्हा एकदा भारतीय संरक्षण मंत्रालयाकडून माहिती दिली जाईल. पाकिस्तानच्या या कृतीचा संपूर्ण देशभरातून निषेध व्यक्त केला जातोय, भारतीय सेना आणि रक्षा मंत्रालय याला काय उत्तर देतो याकडे सर्वांची नजर लागून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT