India Pakistan Ceasefire: हल्ले थांबविण्याचा निर्णय! भारत - पाकिस्तानचे शस्त्रसंधीवर एकमत; अमेरिकेकडून मध्यस्थी

India Pakistan War: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून हल्ले प्रतिहल्ले सुरु होते. याला आता दोन्ही देशांनी सीजफायर करण्यासाठी सहमती दर्शवली आहे.
India Pakistan War Tension 2025
India Pakistan Tension Dainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी युद्धविराम करण्यासाठी सहमती दर्शवली असल्याची माहिती समोर आली आहे. आज (शनिवारी) सायंकाळी पाज वाजेपासून या दोन्ही देशांनी सर्व प्रकारच्या मिलिटरी ऑपरेशन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ड्रम्प यांनी यासाठी मध्यस्थी केली असून, त्याला यश आले आहे.

"पाकिस्तानच्या डिजीएमओ यांनी भारतीय डिजीएमओ यांना दुपारी साडे तीन वाजता फोन केला होता. दोन्ही देशांनी जमीन, जल आणि हवाई मार्गे सुरु असलेले हल्ले आणि लष्करी कारवाई थांबविण्याबाबत सहमती दर्शवली आहे. याबाबत १२ मे रोजी पुन्हा चर्चा होणार आहे", अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी दिली.

India Pakistan War Tension 2025
Arvind Kejriwal Goa Visit: अरविंद केजरीवाल यांचा नियोजित गोवा दौरा रद्द; भारत - पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

पाकिस्तानचे उप-पंतप्रधान इशाक दार यांनी एक्सवर दोन्ही देशातील शस्त्रसंधीबाबत माहिती दिली आहे.

"गेल्या ४८ तासांपासून मी आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स भारतीय आणि पाकिस्तानी पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्याशी चर्चा करत होतो. दोन्ही देशांनी शस्त्रसंधी करण्यावर एकमत दर्शवले आहे. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी शांततेचा मार्ग निवडल्याबाबत आम्ही त्यांचे कौतुक करतो", अशी माहिती अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रिबियो यांनी एक्सवरुन दिली आहे.

India Pakistan War Tension 2025
Operation Sindoor: पाकड्यांचे नागरी वस्तीवर हल्ले, भारतीय अधिकाऱ्याचा मृत्यू; भारतानेही पाकचे 4 एअरबेस केले टार्गेट, रात्रभर काय घडलं वाचा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील याबाबत एक्सवरुन दोन्ही देशांतील शस्त्रसंधीची माहिती दिली आहे.

भारताने पाकिस्तानात ऑपरेशन सिंदूर राबविल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून भारतावर भ्याड हल्ले सुरु केले होते. भारतातील विविध ठिकाणांवर पाकिस्तानने हल्ले करण्याचा प्रयत्न केला. भारतीय लष्कराने हे हल्ले यशस्वीपणे परतवून लावले पण, काही प्रमाणात देशाच्या विविध भागात नुकसान झाले. दरम्यान, दोन्ही देशांचे शनिवारी सायंकाळी पाच वाजेपासून शस्त्रसंधीबाबत एकमत झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com