Babar Azam: भारताचं प्रत्युत्तर बघून बाबर आझमची झोप उडली; मोहम्मद अली जिन्नाला आठवत म्हणाला "पाकिस्तानला....."

Babar Azam Viral Post: पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझम याला देखील सोशल मिडियावर पोस्ट केलीये आणि यावरून बाबर अझम पूर्णपणे घाबरून गेल्याचं स्पष्ट झालंय.
Babar Azam viral statement
Babar Azam viral statementDainik Gomantak
Published on
Updated on

India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या ताणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानातून देखील कलाकार आणि खेळाडूंनी आपापल्या देशांच्या पक्षात मत मांडायला सुरुवात केलीये. पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझम याने देखील सोशल मिडियावर पोस्ट केलीये आणि यावरून बाबर आझम पूर्णपणे घाबरून गेल्याचं स्पष्ट झालंय. नेमकी काय आहे ही पोस्ट पाहूया..

भारताने दहशदवादाच्या विरोधात उचलेल्या शस्त्रामुळे पाकिस्तानची अवस्था सळो-की-पळो अशी झालीये. पाकिस्तान सध्या जगभरातून मदतीची अपेक्षा करतंय. बाबर आझम हा देखील या परिस्थितीला घाबरलाय, एवढा की त्याला थेट मोहम्मद अली जिन्नाची आठवण झालीय.

भारतीय सैन्याचं हे चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला झेपलेलं नाही. दहशदवादाच्या विरोधत भारताने धरण केलेलं हे रूप बघून पाकिस्तान हादरून गेलाय.

Babar Azam viral statement
India Pakistan War:भारत-पाक युद्ध झाल्यास महागाईचा भडका उडण्याची शक्यता; कोणाला बसणार मोठा फटका?

या पोस्टमध्ये बाबर आझम लिहितो की, ‘जगात अशी कोणतीच ताकद नाही, जी पाकिस्तानला हरवू शकेल.’ कदाचित तो या पोस्टमधून भारताने किती हल्ले चढवले तरी पाकिस्तानला काही फरक पडत नसल्याचं असं सांगत आहे. 

 युद्ध झाल्यास कोणाला बसणार फटका?

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाची स्थिति निर्माण झाली आहे. पाकिस्तानकडून येणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला भारत चोख प्रत्युत्तर देतोय, मात्र जर का ही स्थिति युद्धात बदलली तर परिणाम भारताला भोगावे लागू शकतात. युद्धाच्या परिस्थितीत रोजगार, बाजारपेठ, आणि छोट्या उद्योगांवरही परिणाम होतो. भरपूर निधी युद्धावर खर्च होत असल्याने अनुदान, विमा योजना किंवा इतर आर्थिक पाठपुरवठा काही काळासाठी स्थगित होण्याची शक्यता बाळगली जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com