USA Military Emails
USA Military Emails Dainik Gomantak
ग्लोबल

USA Military Emails: एका 'I' ने केला घात अन् अमेरिकेची सारी गुपिते गेली 'माली'च्या हातात

Ashutosh Masgaunde

US Military emails sensitive information mistakenly sent to Mali: संवेदनशील अमेरिकन लष्करी माहिती असलेले हजारो ईमेल पश्चिम आफ्रिकन देश मालीने ऍक्सेस केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे.

डोमेनच्या नावात चूक झाल्यामुळे महत्त्वाची माहिती लीक झाल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. जी माहिती लीक झाली आहे त्यात अमेरिकेचे राजनैतिक दस्तऐवज, टॅक्स रिटर्नची माहिती, उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या प्रवासाचे तपशील इत्यादींचा समावेश आहे.

स्पेलिंगने केले घात

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूएस मिलिटरी 'MIL' डोमेन नेम वापरते परंतु मेल पाठवताना चुकून डोमेन नेममध्ये फक्त 'ML' टाईप केले, ज्यामुळे सर्व संवेदनशील माहिती मालीपर्यंत पोहोचली कारण मालीचे डोमेन नेम 'ML' आहे.

विशेष म्हणजे माली हा रशियाचा मित्र देश आहे. अशा परिस्थितीत अमेरिकन लष्कराशी संबंधित ही गळती अमेरिकेसाठी अडचणीचे कारण बनू शकते.

संवेदनशील माहिती लीक होण्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे असे नाही. सुमारे दशकभरापूर्वी पहिल्यांदाच अमेरिकन लष्कराची एवढी संवेदनशील माहिती मालीमध्ये पोहोचली होती, तेव्हापासून अनेक घटना घडल्या आहेत.

याचा खुलासा डच इंटरनेट व्यावसायिक जोहान्स गेर्बेयर यांनी केला आहे. खरं तर, फक्त Gerber मालीचे डोमेन व्यवस्थापित करतो.

जानेवारी 2023 पासून, अमेरिकन सैन्याच्या संवेदनशील माहितीशी संबंधित सुमारे एक लाख सतरा हजार ईमेल मालीच्या डोमेनवर पोहोचले आहेत. बुधवारीच असे सुमारे एक हजार ईमेल पाठवण्यात आले आहेत.

अमेरिकन प्रशासनाला माहिती

जोहान्स गर्बेयर (Johannes Zuurbier) यांनी अमेरिकन अधिकाऱ्यांना ही माहिती दिली आहे. यासोबतच व्हाईट हाऊसलाही याबाबत सांगण्यात आले आहे.

या वर्षी लीक झालेल्या ईमेलमध्ये, यूएस आर्मी चीफ ऑफ स्टाफ जनरल जेम्स मॅककॉनव्हिल यांच्या भेटीशी संबंधित माहिती लीक झाली होती.

यूएस पेंटागॉनचे प्रवक्ते लेफ्टनंट कमांडर टिम गोरमन यांनी या घटनांबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांना परिस्थितीची जाणीव आहे आणि ते थांबवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News : पाटकर यांनी माफी मागावी; आमोणकरांची मागणी

Bicholim Factory Explosion : डिचोलीतील दुर्घटना; कारखान्यात सलग चार स्फोट

Video: मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदने पुन्हा ओकली गरळ; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Mopa Airport : ‘मोपा’वर येणार ‘गोल्फ कोर्स’; ‘एअरोसिटी’साठी प्रयत्न

Goa Politics:...तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; आपचे डॉ. प्रमोद सावंत यांना आव्हान

SCROLL FOR NEXT