Attack On Hindu Temple: पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिरावर रॉकेट लाँचरने हल्ला

Mari Mata Temple Karachi: हिंदू समुदायाला कराचीच्या सोल्जर बाजारमध्ये त्यांचे 150 वर्ष जुने पवित्र मरी माता मंदिर पाडल्याचे आढळून आले.
Attack On Hindu Temple
Attack On Hindu TempleDainik Gomantak
Published on
Updated on

Attacks on Hindu Temples in Pakistan: रविवारी पहाटे सिंधच्या काश्मोरमधील हिंदूंच्या मंदिरावर एका टोळीने 'रॉकेट लाँचर्स'च्या साह्याने हल्ला केला. 24 तासांमध्ये हिंदू मंदिराची तोडफोड करण्याची ही दुसरी घटना आहे.

पहिल्या घटनेत कराचीमध्ये शनिवारी मध्यरात्री मारी माता मंदिर जमीनदोस्त करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर हिंदू नागरिकांच्या समोर हा प्रकार उघड झाला.

काश्मोरमध्ये, हल्लेखोरांनी घौसपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हिंदूंच्या मंदिरावर आणि त्यालगतच्या घरांवर हल्ला केला. त्यांनी मंदिरे आणि घरांवर अंदाधुंद गोळीबार केला.

गोळीबाराच्या आवाजानंतर कश्मोर-कंधकोटचे एसएसपी इरफान सामो यांच्या नेतृत्वाखालील पोलिस तुकडी घटनास्थळी पोहोचली.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दरोडेखोरांनी प्रार्थनास्थळावर 'रॉकेट लाँचर' गोळीबार केला. सुदैवाने हल्ल्यावेळी मंदिर बंद होते. पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की बागरी समुदायाद्वारे आयोजित धार्मिक सेवांसाठी मंदिर दरवर्षी उघडले जाते.

Attack On Hindu Temple
Chandrayan 3 | आमचे 45 ट्रिलियन डॉलर लुटले त्याचे काय? चांद्रयान 3 च्या प्रक्षेपणानंतर खोडसाळपणा करणाऱ्या ब्रिटिश नेत्याला भारतीयांनी सुनावले

दरम्यान, बागरी समुदायाचे सदस्य सुरेश यांनी सांगितले की, हल्लेखोरांनी उडवलेले "रॉकेट लाँचर्स" स्फोटात अयशस्वी झाले, परिणामी कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या घटनेने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे सांगून त्यांनी समुदायाचे रक्षण करण्यासाठी पोलिसांना आवाहन केले.

दरम्यान, पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने (एचआरसीपी) सांगितले की, “सिंधमधील कश्मोर आणि घोटकी जिल्ह्यांमध्ये बिघडत चाललेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या अहवालामुळे ते घाबरले आहेत, जिथे महिला आणि मुलांसह हिंदू समुदायाच्या 30 सदस्यांना गुन्हेगारी टोळ्यांनी ओलिस ठेवले होते.”

कराचीतील सोल्जर बाझार येथिल 150 वर्ष जुने पवित्र मरी माता मंदिर.
कराचीतील सोल्जर बाझार येथिल 150 वर्ष जुने पवित्र मरी माता मंदिर. Dainik Gomantak
Attack On Hindu Temple
Honey Trap Killing प्रकरणी 5 जण दोषी; ब्रिटनमध्ये गमावला होता भारतीयाने जीव

शुक्रवार-शनिवारच्या रात्री घडलेल्या अन्य घटनेत, शनिवारी सकाळी कराचीमधील हिंदू समुदायाला कराचीच्या सोल्जर बाजारमध्ये त्यांचे 150 वर्ष जुने पवित्र मरी माता मंदिर पाडल्याचे आढळून आले.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा परिसरात वीज नसताना ही कारवाई करण्यात आली. बुलडोझरच्या सहाय्याने त्यांनी त्यांनी बाहेरील भिंती आणि मुख्य गेट शाबूत ठेवत आतील संपूर्ण रचना उद्ध्वस्त केली.

बुलडोझर आणि इतर उपकरणे चालवणाऱ्या व्यक्तींना 'कव्हर' देण्यासाठी पोलिस वाहन उपस्थित असल्याचा दावा रहिवाशांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com