Princess Diana's Iconic Sweater: गोष्ट 42 वर्षांपूर्वीच्या स्वेटरची... प्रिन्सेस डायना यांनी वापरलेल्या स्वेटरचा होणार लिलाव

Princess Diana's Sweater: सॅली मुइर आणि जोआना ऑस्बोर्न यांनादेखील जागतिक पातळीवर ओळख मिळाली.
Princess Diana's Iconic Sweater
Princess Diana's Iconic SweaterDainik Gomantak
Published on
Updated on

Princess Diana's Sweater: प्रिन्सेस डायनाने घातलेल्या स्वेटरचा लिलाव होणार आहे. या लिलावात $50,000 पेक्षा जास्त किमतीत हा स्वेटर विकला जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

  • असे आहे स्वेटर

फुल स्लीव्ह असलेल्या लाल कलरच्या स्वेटरवर पांढऱ्या रंगाच्या मेंढ्याचा कळप दिसून येतो. या कळपामध्ये एकच काळी मेंढी आहे. एके काळी स्टाईल आयकॉन बनलेल्या प्रिन्सेस डायनाच्या या स्वेटरला किती किंमत मिळणार याची उत्सुकता संपूर्ण जगाला लागली आहे. सप्टेंबरमध्ये सोथेबीच्या ऑनलाइन फॅशन आयकॉन्सच्या विक्रीमध्ये लिलावासाठी हे स्वेटर ठेवण्यात आले आहे.

  • गोष्ट प्रिन्सेस डायनाच्या स्वेटरची

प्रिन्सेस डायना 19 वर्षांची असताना जून 1981 मध्ये पोलो मॅचमध्ये स्वेटर घातलेले फोटो काढले होते. तेव्हा तिचा नुकताच तत्कालीन प्रिन्स चार्ल्सशी साखरुपुडा झाला होता. त्यानंतर प्रिन्सेस डायना एक स्टाईल आयकॉन बनल्या आणि सर्वात जास्त फोटो काढल्या जाणाऱ्या महिलांपैकी एक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. महत्वाचे म्हणजे, या स्वेटरचे डिझाइनर सॅली मुइर आणि जोआना ऑस्बोर्न यांना देखील जागतिक पातळीवर ओळख मिळाली.

मिळालेल्या माहीतीनुसार, या स्वेटरच्या बाह्या खराब झाल्या होत्या त्यामुळे ते दुरुस्त केले जाऊ शकते का अशी विचारणा करणारे पत्र बकिंगहम पॅलेसकडून डिझायनर्सना मिळाले होते आणि ओरिजनल स्वेटर परत करण्यात आले होते.

स्वेटरच्या बाह्या प्रिन्सेस डायनाच्या डायमंड रिंगमुळे खराब झाल्याचे डिझायनर्सच्या लक्षात आले होते. त्यावेळी डिझायनर्सनी प्रिन्सेस डायनासाठी एक नवीन स्वेटर विणले. हे नवीन स्वेटर 1983 मध्ये एका कार्यक्रमात प्रिन्सेस डायनाने पांढरी जिन्स आणि काळ्या रिबनच्या टाय सोबत तिने हे स्वेटर घातले होते.

Princess Diana's Iconic Sweater
China Foreign Minister Qin Gang: आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ, चीनचे परराष्ट्र मंत्री तीन आठवड्यांपासून 'बेपत्ता'

असोसिएटेड प्रेसने म्हटल्यानुसार, वार्म अँड वंडरफुल कंपनी अजूनही या डिझाइनचे कॉटनच्या कपड्याचे स्वेटर बनवून 190 पौंड ($250) मध्ये विकते. या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा डिझायनरला पोटमाळ्यातील बॉक्समध्ये प्रिन्सेस डायनाचे ओरिजनल स्वेटर सापडले तेव्हा त्यांनी या स्वेटरचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला.

सोथेबीच्या फॅशन आणि अॅक्सेसरीजच्या जागतिक प्रमुख सिंथिया हॉल्टन या स्वेटरबद्दल बोलताना म्हणतात की, हे इतके सुंदर आणि अप्रतिम स्वेटर प्रिन्सेस डायनाच्या फॅशनच्या सेन्सबद्दल, त्यांच्या दृष्टीकोनाबद्दल बरेच काही सांगून जातो.

किती असणार स्वेटरची किंमत

स्वेटरची अंदाजे किंमत $50,000 ते $80,000 आहे. हे स्वेटर 7-13 सप्टेंबरपर्यंत सोथबीच्या न्यूयॉर्क शोरूममध्ये प्रदर्शनासाठी ठेवले जाणार आहे, तर त्याची ऑनलाइन बोली 31 ऑगस्ट सुरु होऊन 14 सप्टेंबरपर्यंत असणार आहे अशी माहिती सोथेबीने दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com